IND vs ZIM : IPL नंतर ‘या’ संघाशी भिडणार भारतीय संघ, जुलैमध्ये करणार दौरा; वेळापत्रक जाहीर
IND vs ZIM : भारतीय संघ आयपीएलनंतर जुलै महिन्यात तीन टी20 सामन्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार असल्याची माहिती बीसीआयकडून देण्यात आली आहे.
IND vs ZIM : भारतीय संघ आयपीएलनंतर जुलै महिन्यात तीन टी20 सामन्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार असल्याची माहिती बीसीआयकडून देण्यात आली आहे. जुलैमध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी आज बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या मालिकेची सुरुवात 23 जुलैपासून होणार असून या मालिकेचा शेवटचा सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
भारतीय संघाने यापूर्वी 2024 मध्ये पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs ZIM) झिम्बाब्वेचा दौरा केला होता. त्यावेळी भारताने 4-1 ने ही मालिका जिंकली होती. बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजित सैकिया (Devjit Saikia) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ या दौऱ्यावर तीनही टी20 सामने हरारे येथे खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 23 जुलै रोजी, दुसरा सामना 25 जुलै रोजी आणि तिसरा टी20 सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.
तर दुसरीकडे झिम्बाब्वेचा संघ देखील 2027 मध्ये भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाविरोधात झिम्बाब्वे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता, दुसरा सामना हैदराबाद आणि तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना मुंबई येथे खेळवला जाणार आहे.
🚨 News 🚨
Presenting the schedule for #TeamIndia‘s (Senior Men) Tour of Zimbabwe for a 3️⃣-match T20I series in July 2026! 🗓️
More details 🔽 | #ZIMvINDhttps://t.co/KsJRRqe4l8 pic.twitter.com/Tf21abYmTb
— BCCI (@BCCI) April 1, 2026
भारत – झिम्बाब्वे टी20 मालिका वेळापत्रक
पहिला T20 सामना – 23 जुलै – हरारे
दुसरा T20 सामना – 25 जुलै – हरारे
तिसरा T20 सामना – 26 जुलै – हरारे