BCCI ला मोठा धक्का; IPL 2026 दरम्यान खेळली जाणार ODI आणि T20 मालिका, वेळापत्रक जाहीर

IPL 2026 : टी20 विश्वचषकानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल 2026 कडे लागले आहे. आयपीएल 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून

IPL 2026

IPL 2026 : टी20 विश्वचषकानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल 2026 कडे लागले आहे. आयपीएल 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून यंदा कोण बाजी मारणार याबाबत सध्या तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे आयपीएल 2026 दरम्यान बीसीबी म्हणजेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. आयपीएल 2026 दरम्यान बांगलादेश न्यूझीलंडविरुद्ध (BNG vs NZ) ओडीआय आणि टी20 मालिका खेळणार आहे. जर या मालिकेसाठी न्युझीलंडने आपल्या प्रमुख खेळाडूंची निवड केली तर याचा काही परिणाम आयपीएलवर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नुकतंच बीसीबीकडून (BCB) या दौऱ्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने न्यूझीलंड संघाच्या आगामी दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘व्हाइट-बॉल’ मालिका एप्रिल-मे 2026 मध्ये होणार असून, यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODIs) आणि तीन टी20 आंतरराष्ट्रीय (T20Is) सामन्यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे बांगलादेशी खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग नसल्याने या मालिकेसाठी बांगलादेश आपला मेन संघ मैदानात उतरवेल तर न्यूझीलंडचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्याने न्यूझीलंड या मालिकेसाठी आपला ब संघ उतरवू शकतो. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ 13 एप्रिल रोजी ढाका येथे दाखल होणार आहे. या मालिकेची सुरुवात एकदिवसीय सामन्यांनी होईल. पहिले दोन एकदिवसीय सामने ढाका येथील मीरपूरमध्ये खेळले जातील, तर तिसरा सामना चट्टोग्राम येथे होईल. टी20 सामने देखील याच दोन्ही शहरांमध्ये खेळले जातील. ही मालिका 17 एप्रिल ते 2 मे या कालावधीत खेळली जाणार आहे.

बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आहे आणि आता ते न्यूझीलंडविरुद्धही आपली ही विजयी मालिका कायम राखण्यास उत्सुक आहेत.

एकदिवसीय  मालिकेचे वेळापत्रक:

पहिला ओडीआय : 17 एप्रिल 2026 , मीरपूर (ढाका)

दुसरा ओडीआय : 20 एप्रिल 2026 , मीरपूर (ढाका)

तिसरा ओडीआय ODI: 23 एप्रिल 2026, चट्टोग्राम

नांदेड, सोलापूर, लातूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून धो धो पाऊस अन् गारपिटीचा इशारा-

T20 मालिकेचे वेळापत्रक:

पहिला सामना : 27 एप्रिल 2026 , चट्टोग्राम

दुसरा सामना : 29 एप्रिल 2026 , चट्टोग्राम

तिसरा सामना : 2 मे 2026, मीरपूर (ढाका)

follow us