T20 World Cup मध्ये मोठा उलटफेर; झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरविले
ICC Men's T20 World Cup-ICC Men's T20 World Cup-झिम्बाब्वे संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलंय. वर्ल्डकपमधील हा पहिला मोठा उलटफेर आहे.
ICC Men’s T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये (ICC Men’s T20 World Cup) ब गटातील सामन्यात पहिला मोठा उलटफेर झालाय. झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला (Australia) 23 धावांनी पराभूत केलंय. कोलंबोमध्ये ही लढत झाली. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या झिम्बाब्वेने दोन विकेट्सच्या बदल्यात 169 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 ओव्हरमध्ये 146 धावांत गारद झाला. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने 64 धावांची जोरदार खेळी केलीय. तर तादिवानाशे मारुमानी याने 35 धावा काढल्या. कर्णधार सिकंदर रजा याने 25 धावांची खेळी केली. तर ब्लेसिंग मुझारबानी आणि ब्रॅड इव्हान्ससमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. (ICC Men’s T20 World Cup Zimbabwe Beat Australia)
मुझारबानी आणि ब्रॅड इव्हान्सने ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर आणले
फलंदाजांनी आपले काम केल्यानंतर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा बलाढ्या फलंदाजांना गुडघ्यावर आणले. मुझारबानी आणि ब्रॅड इव्हान्ससमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज तग धरू शकले नाहीत. ब्लेसिंग मुझारबानीने जोश इंगलिसला बाद झाले. त्यानंतर त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड हे खाते उघडू शकले नाही. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज 29 धावांवर बाद झाले. पण ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू रेनशॉ या जोडीने पाचव्या विकेससाठी 50 धावांची भागिदारी केली. ग्लेन मॅक्सवेल 31 धावांवर बाद झाला. तर रेनशॉ ही 65 धावांवर बाद झाला. त्यानंतर तळातील फलंदाजही खास काही करू शकले नाहीत. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर मुझारबानीने चार विकेट घेतल्या.
ब्रेनेट बेनेटचे शानदार अर्धशतक
झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने नाबाद 64 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाजांना भीक घातले नाही. त्याने 56 चेंडूत सात चौकार मारले. 15 ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने 1 विकेट्सच्या बदल्यात 125 धावा काढल्या होत्या. परंतु शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 44 धावा काढल्या. झिम्बाब्वेकडून तदिवानाशे मारुमानीने 45 आणि रायन बर्लने 35 धावांची उपयुक्त खेळी केली.य तर कर्णधार सिकंदर रझाने ही 13 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी केली. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडसारखे वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात नाही. त्याचा फायदा झिम्बाब्वेने उठविला.
अॅडम झम्पाला नाचविले !
अॅडम झम्पाच्या फिरकीसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज सावध खेळले. त्याच्या चार ओव्हरमध्ये 31 धावा केल्या आहेत. परंतु त्याला एकही विकेट मिळू दिली नाही.
