Sunil Gavaskar : चुका सुधारा नाही तर वर्ल्ड कप गेलाच समजा! गावस्कर काय म्हणाले वाचा
मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला पहिल्या वनडे सामन्यात 12 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 350 धावांचे मोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात 131 धावांवर न्यूझीलंडचे 6 फलंदाज माघारी परतले होते. मात्र किवी संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. परंतु हा सामना भारताने जिंकला. मात्र सामना झाल्यानंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या रणानितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सुनील गावस्कर म्हणाले, “धावांचा बचाव करणं ही टीम इंडियासाठी नेहमीच समस्या राहिली आहे.टीम इंडिया धावांचा पाठलाग करताना मजबूत संघ आहे. जर हीच स्थिती म्हणजे टीम इंडियाला 350 धावांचा पाठलाग करायचा असता, तर भारतीय संघाने देखील यशस्वीरीत्या पाठलाग केला असता.”
तसेच ते पुढे म्हणाले, “आपण यापूर्वी देखील पाहिलं आहे. टी -20 स्वरूपात टीम इंडिया 220 धावांचे आव्हान देखील पूर्ण करू शकते. मात्र जेव्हा धावांचा बचाव करण्याची वेळ येते त्यावेळी टीम इंडियाला अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे स्पष्ट दिसून येत आहे की, गोलंदाजी हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. या बाबतीत टीम इंडियाला विचार करावा लागेल.”
यावर्षी वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाला गोलंदाजीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. या स्पर्धेसाठी काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला लवकरात लवकर गोलंदाजी लाईनअप देखील तयार करावी लागणार आहे.