IND vs NZ : भारताचे जोरदार पुनरागमन! राहुल-जायसवालची दमदार फलंदाजी; 10 वर्षांनंतर मोडला ‘हा’ विक्रम

IND vs NZ : वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने जोरदार कमबॅक

  • shakir sayyad
  • Written By: Published:
IND Vs NZ

IND vs NZ : वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने जोरदार कमबॅक केले आहे. दुसऱ्या दिवसी न्यूझीलंडच्या 368 धावांच्या आव्हानाला भारतीय फलंदाजांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या पहिल्या डावात 1 विकेट गमावून 159 धावा केल्या आहे. भारत आता देखील न्यूझीलंडपेक्षा 209 धावांनी पिछाडीवर आहे. भारतासाठी सध्या के.एल. राहुल 52 धावांवर तर देवदत्त पडिक्कल 16 धावांवर खेळत आहे.

भारतासाठी (IND vs NZ ) डावाची सुरुवात करताना यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि के. एल. राहुल (K. L. Rahul) यांनी न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांना सुरुवातीला कोणतीही संधी दिली नाही आणि पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी भारताने केवळ एक विकेट गमावली. यशस्वी जैस्वालने  89 चेंडूंत 85 धावांची खेळी केली. दोन्ही भारतीय सलामीवीरांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. गेल्या 10 वर्षांत न्यूझीलंडच्या भूमीवर, पाहुण्या संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी एकाच कसोटी डावात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नोव्हेंबर 2016 मध्ये हॅमिल्टन कसोटीत पाकिस्तानचे सलामीवीर समी अस्लम आणि अझहर अली यांनी 369 धावांचा पाठलाग करताना अशी कामगिरी केली होती.

यंदाच्या लग्नसराईत मोडणार सर्व रेकॉर्ड्स; देशभरात 25 दिवसांत होणार 52 लाख लग्न

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 368 धावा

दिवसाच्या सुरुवातीला, न्यूझीलंडने 243/5 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला आणि अखेरीस त्यांचा डाव 368 धावांवर संपला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्स 175 धावांवर नाबाद राहिला, तर ग्लेन फिलिप्सने 118 धावांची शतकी खेळी केली. भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतले, तर आकाश दीपने ३ फलंदाजांना आऊट केले

follow us