IND vs NZ : भारताची दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडी राखून मात
लखनऊ : टीम इंडियानं (Team India) टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर (new zealand) 6 गडी राखून मात केली आहे. यासह भारतीय संघानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. या मालिकेतील तिसरा सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium)होणारंय.
लखनऊच्या भारतरत्न अटल विहारी वाजपेयी स्टेडियमवर रविवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला 20 षटकांत 8 गडी बाद 99 धावाच करता आल्या. कर्णधार मिचेल सँटनरनं नाबाद 19 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेल आणि मार्क चॅम्पमन 14-14 धावांवर बाद झाले आणि सलामीवीर फिन ऍलन आणि ड्वेन कॉनवे यांनी 11-11 धावा केल्या.
भारताकडून अर्शदीप सिंगनं दोन बळी घेतले. कर्णधार हार्दिक पांड्या, दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारतानं 100 धावांचे लक्ष्य एक चेंडू राखून 4 गडी गमावून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक नाबाद 26 धावा केल्या. इशान किशननं 19 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेल आणि ईश सोधीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.