टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार 5 कसोटी सामने, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळले जाणार हे सामने
भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी लॉर्ड्सशिवाय ओव्हल, एजबॅस्टन, हेडिंग्ले आणि ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानाची निवड करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मैदानांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2027 युनायटेड किंगडममध्ये आयोजित केली जाईल. (india-tour-of-england-2024-headingley-manchester-and-other-venues-here)
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मैदानांची नावे जाहीर केली
लॉर्ड्स व्यतिरिक्त, अॅशेस मालिका 2027 एजबॅस्टन, ट्रेंट ब्रिज आणि एजेस बाउल येथे खेळली जाईल. त्याचबरोबर भारतीय संघ 2024 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमान इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मैदानांची नावे जाहीर केली आहेत. त्याच वेळी, इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
MPL : महाराष्ट्र प्रीमियर लीगचा महासंग्राम उद्यापासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक
टीम इंडियाच्या आगामी मालिकेचे वेळापत्रक काय आहे?
विशेष म्हणजे 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये खेळवली जाईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका डिसेंबर-जानेवारी 2024 मध्ये खेळवली जाईल. त्याचबरोबर टीम इंडिया जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाच्या उर्वरित मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-बांगलादेश कसोटी मालिका सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये खेळवली जाईल.