IPL 2027 ‘या’ दिवशी होणार लिलाव; खेळाडूंवर लागणार कोट्यवधी रुपयांची बोली

IPL 2027 : बीसीसीआयकडून आयपीएल 2027 साठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी पुढील काही दिवसात खेळाडूंचा लिलाव देखील होणार आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
IPL 2027

IPL 2027 : बीसीसीआयकडून आयपीएल 2027 साठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी पुढील काही दिवसात खेळाडूंचा लिलाव देखील होणार आहे. ज्यामध्ये खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागणार आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2027 साठी डिसेंबर महिन्यात लिलाव होणार आहे.

आयपीएल 2027 लिलाव कधी होणार?

‘क्रिकइन्फो’ (Cricinfo) ने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2027 चा लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. 2028 च्या हंगामासाठी होणाऱ्या मोठ्या लिलावापूर्वीचा (Mega-Auction) हा शेवटचा ‘मिनी-लिलाव’ असणार आहे. आयपीएल 2027 साठी खेळाडूंची बोली 7 डिसेंबर ते  13 डिसेंबर या कालावधीत लावली जाईल. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचे लिलाव परदेशात आयोजित केले जात होते, परंतु यावेळी हा कार्यक्रम भारतात होणार आहे.

लिलाव भारतात का ?

आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2027 चा लिलाव भारतात होईल. सलग तीन वर्षे परदेशात लिलाव आयोजित केल्यानंतर, आयोजकांना हा कार्यक्रम पुन्हा देशात आणण्याची इच्छा आहे. मागील तीन लिलाव दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे झाले होते.

हवामान विभागाचा अंदाज चुकला? मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी

अरुण धुमल म्हणाले, “आम्ही दरवर्षी भारतात याचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, लग्नसराईच्या हंगामामुळे आम्हाला अनेकदा योग्य ठिकाण (venue) मिळवण्यात अडचणी येतात. यावेळी आम्हाला भारतातच हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे कारण हा एक ‘मिनी-लिलाव’ आहे आणि आम्हाला योग्य ठिकाण मिळेल अशी आशा आहे.”

follow us