अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
KS Bharat Retirement : आयपीएलनंतर संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याकडे लागले आहे.
KS Bharat Retirement : आयपीएलनंतर संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याकडे लागले आहे. 6 जूनपासून सुरु होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या एका स्टार खेळाडूने अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक – फलंदाज के.ए. भरत याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर याबाबत त्याने माहिती दिली आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्याने विराट कोहली, रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे आभार मानले आहे. भरतने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीकडून आयपीएलमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
के.ए. भरतला भारतासाठी केवळ कसोटी सामनेच खेळण्याची संधी मिळाली. त्याला एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमध्ये भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. भरतने 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम सामन्यातही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, आपल्या फलंदाजीने तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही.
KS Bharat, Team India wicketkeeper-batsman who played 9 Test matches for India, announced his retirement from cricket today. In his retirement post, he gave special credit to Rohit Sharma and expressed his gratitude for making his Test debut under his captaincy.
Congratulations… pic.twitter.com/RPSALgVCyb
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 4, 2026
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ; ‘या’ ठिकाणी 13 लाखांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त-
भारतासाठी 7 कसोटी सामने खेळताना, त्याने 20.09 च्या सरासरीने 199 धावा केल्या. त्याच्या नावावर एका अर्धशतकाची नोंद आहे. त्याने 2023 मध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते, तर त्याचा शेवटचा सामना 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध खेळला गेला.