ललित मोदींचा माफीनामा, ‘मी असे काहीही करणार नाही…’

ललित मोदींचा माफीनामा, ‘मी असे काहीही करणार नाही…’

Lalit Modi Apologize: क्रिकेट लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी मंगळवारी ट्विट करून माफी मागितली आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल ताशेरे ओढले आणि त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले होते.

ललित मोदींनी लिहिले की, 13 जानेवारी आणि 30 मार्च 2023 च्या माझ्या सोशल मीडिया पोस्टसाठी मी बिनशर्त सार्वजनिक माफी मागतो. मी पुनरुच्चार करतो की मला भारतीय न्यायव्यवस्था आणि माननीय न्यायालयाचा सर्वोच्च आदर आहे. मी असे काहीही करणार नाही जे कोणत्याही प्रकारे माननीय न्यायालय किंवा भारतीय न्यायव्यवस्थेच्या गौरवाशी किंवा प्रतिष्ठेशी विसंगत असेल.

Atiq Ahmed: आता मानवाधिकार आयोगाची ‘इंट्री’; यूपी पोलिसांना बजावली नोटीस

ललित मोदी पुढे म्हणाले की, मी पुन्हा सांगतो की भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा किंवा सार्वजनिक प्रतिष्ठा कमी करण्याचा माझा कोणताही हेतू नाही आणि कधीही नव्हता. मी न्यायालय आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो. सुप्रीम कोर्टाने ललित मोदींना सोशल मीडिया आणि प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये माफी मागण्याचे निर्देश दिले होते.

न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले होते की ललित मोदीला कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. त्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम्ही समाधानी नाही. न्यायालयाने त्यांना माफी मागण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते की भविष्यात अशी कोणतीही पोस्ट केली जाणार नाही ज्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube