wrestlers Protest : हा दिवस पाहण्यासाठी आम्ही पदकं मिळवली का? कुस्तीपटुंचा केंद्र सरकारला सवाल

wrestlers Protest : हा दिवस पाहण्यासाठी आम्ही पदकं मिळवली का? कुस्तीपटुंचा केंद्र सरकारला सवाल

Protesting wrestlers and police clash in Delhi : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाच्या (sexual abuse) आरोपावरून दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील कुस्तीपटूं मागील गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी, ही आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, त्या आंदोलनाच्या ठिकाणी काल रात्री आंदोलक कुस्तीपटू (Protest wrestler) आणि पोलिस एकमेकांमध्ये भिडल्याने मोठा राडा झाला.

बुधवारी रात्री उशिरा जंतरमंतरवर आंदोलक कुस्तीपटूंसोबत दिल्ली पोलिसांची झटापट झाली. कुस्तीपटूंना निषेधाच्या ठिकाणी अतिरिक्त गाद्या आणि लाकडी बाक आणायचे होते. कारण संध्याकाळी राष्ट्रीय राजधानीत झालेल्या पावसामुळे त्यांचे जुने गाद्या ओले आणि ओले झाले होते. पण दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना निषेधाच्या ठिकाणी गाद्या आणि बेंच घेऊन जाण्याची परवानगी दिली नाही. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलिसाने कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांच्याशी गैरवर्तन केले. त्याने महिला कुस्तीपटूंनाही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा, VIDEO समोर

यावर कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अश्रुंचा बांध फुटला तिने यावेळी परखड शब्दांत केंद्र सरकारला सवाल केला विनेश म्हणाली की, ‘आम्ही देशीसाठी पदकं जिंकली तेव्हा आम्हाला वाटंल नव्हतं की, आम्हाला हा दिवस पाहावा लागेल. त्यामुळे मी म्हणते की कोणत्याही खेळाडुंनी देशासाठी पदकं जिंकू नये.’ तसेच हा दिवस पाहण्यासाठीच आम्ही पदकं मिळवली का? असं तिने केंद्र सरकारला खडसावून विचारले आहे.

आम्ही येथे पावसात होतो. झोपायला जागा नसल्याने पोलिसांनी आम्हाला झोपण्यासाठी पलंगही आणू दिला नाही. पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. त्यातील काही पोलीस नशेत होते. गुन्हा करून बृजभूषण शरण सिंह आरामात घरात झोपत आहे आणि आम्हाला अशा परिस्थितीत उपोषण कराव लागत आहे. अशी खंत तिने यावेळी व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube