अजित आगरकरांनंतर टीम इंडियाचा सिलेक्टर कोण? माजी दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत!

Ramesh Powar in BCCI Selection Committee: बीसीसीआयच्या निवड समितीतील रिक्त जागेसाठी माजी फिरकीपटू रमेश पोवार यांचे नाव चर्चेत आहे.

Ramesh Powar in BCCI Selection Committee

Ramesh Powar in BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील रिक्त जागा भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर समितीतील एक जागा रिक्त आहे. आता या जागेसाठी मुंबईचे माजी फिरकीपटू रमेश पोवार (Ramesh Powar) याचं नाव चर्चेत आलं आहे. रमेश पोवार यांनी या पदासाठी अर्ज केला असून ते या शर्यतीत आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी, डीजे-डॉल्बीवरही निर्बंध

पार्थिव पटेलच्या नावाचीही होती चर्चा

अजित आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबरला संपला. त्यानंतर बीसीसीआयने निवड समितीतील रिक्त पद भरण्यासाठी अर्ज मागवले होते. सुरुवातीला गुजरातचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल (parthiv patel) या पदासाठी अर्ज करेल, अशी चर्चा होती. मात्र, अर्ज करण्याची अंतिम मुदत संपूनही त्याने उमेदवारी दाखल केली नाही. त्यामुळे आता रमेश पोवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

नियमानुसार, ही जागा पश्चिम विभागातून भरली जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या रमेश पोवार यांचा या पदासाठी विचार होऊ शकतो. मात्र, त्यांच्या नावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी

रमेश पोवार यांनी यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. मात्र, वरिष्ठ पुरुष संघाच्या निवड समितीत काम करण्याची ही त्यांची पहिलीच संधी ठरू शकते. त्यांची निवड झाल्यास भारतीय पुरुष संघाच्या खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका असेल.

लिस्टिंग होताच जिओ बनणार भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी; कोणत्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकणार ?

दरम्यान, निवड समितीतील रिक्त जागा भरली जाणार असली, तरी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले होते की, सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण निवड समितीच्या सर्व बैठकांना उपस्थित राहतील. या नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

रमेश पोवार यांची क्रिकेट कारकीर्द कशी राहिली?

रमेश पोवार यांनी भारताकडून दोन कसोटी सामने खेळले असून, या सामन्यांमध्ये त्यांनी सहा विकेट घेतल्या. त्यांची एकदिवसीय कारकीर्द तुलनेने मोठी होती. त्यांनी 31 एकदिवसीय सामन्यांत 34 विकेट मिळवल्या.

पुण्यात आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे संकट

गोलंदाजीसोबतच पोवार यांनी फलंदाजीतही आपली छाप सोडली होती. इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात भारताची अवस्था पाच बाद 80 अशी असताना त्यांनी एम.एस. धोनीसोबत महत्त्वाची भागीदारी केली होती. या सामन्यात पोवार यांनी 54 धावा केल्या होत्या.

आता बीसीसीआयच्या निवड समितीत त्यांना संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

follow us