Rohit Sharma : BCCI अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न पण प्रतिसाद नाही; रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त?

Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रविवारी 19 जुलै खेळवला जाणार आहे.

Rohit Sharma

Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रविवारी 19 जुलै खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सामन्यानंतर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याचा दावा मीडिया अहवालात करण्यात येत आहे.

मीडिया अहवालानुसार, निवड समितीच्या 2027 च्या विश्वचषकाच्या योजनांमध्ये रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश नसल्याने भविष्यातील मालिकांसाठी त्याची निवड होण्याची शक्यता कमी असल्याचा निर्णय बीबीसीआयच्या (BCCI) निवडकर्त्यांनी रोहित शर्माला कळवला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा निवृत्त होणार असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे निवड समितीच्या या निर्णयाने रोहित शर्मा नाराज असून याबाबत रोहितने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, रोहित 19 जुलै रविवारी लॉर्ड्स (Lord’s) क्रिकेट मैदानावर भारतीय संघासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने 39 वर्षीय रोहितला कळवले आहे की तो आता विश्वचषकाच्या योजनांचा भाग नाही, कारण त्यांना ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये यशस्वी जैस्वालसारख्या (Yashasvi Jaiswal) युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. यानंतर रोहितने बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे रोहित नाराज आहे .

गेल्या वर्षी रोहितला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार जिंकून रोहितने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये तो चांगली कामगिरी करु शकला नाही.

नैतिक जबाबदारी स्वीकारा अन् राजीनामा द्या; वांगचुक देशावर प्रेम करणारा, अभिनेते सयाजी शिंदे भडकले-

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2024 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ मालिकेनंतर गेल्या वर्षी त्याने कसोटी कारकिर्दीला रामराम ठोकला.

follow us