India vs New Zealand : शुभमन गिलने भारताला सावरले मग न्यूझीलंडला धुतले…

India vs New Zealand : शुभमन गिलने भारताला सावरले मग न्यूझीलंडला धुतले…

हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत सलग दुसरे शतक झळकावले.

तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने केली या दोघांनी सावध खेळी करत पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली.

कर्णधार रोहित शर्मा 34 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला रनमशीन अर्थात विराट कोहली काही खास करू शकला नाही. तो केवळ 8 धावा करून बाद झाला. विराटनंतर ईशान किशनने देखील 5 धावा करून बाद झाला.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने शुभमनला चांगली साथ देत चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. भागिदारी जमली असे वाटत असताना सुर्या 31 धावा करून बाद झाला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजीत फर्ग्युसन, स्टँनर, टिकणर, यांनी प्रत्येकी 1 विकेट तर डॅरेल मिचेलने 2 जणांना बाद केले. सध्या शुभमन आणि वॉश्गिंटन सुंदर मैदानावर खेळत आहेत. शुभमन 135 तर सुंदर 1 धावांवर खेळत आहेत. 40 षटकानंतर भारताची धावसंख्या 5 बाद 250 झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube