अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; स्टार गोलंदाज मालिकेतून बाहेर
Varun Chakravarthy : अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात सुरु असणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का
Varun Chakravarthy : अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात सुरु असणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला असून स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत विजय मिळवला होता. वरुण इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन केले होते मात्र त्यांना पुन्हा एकदा दुखापती झाल्याने मालिकेतून बाहेर जावे लागणार आहे.
दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर
‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून (IND vs AFG) बाहेर पडला आहे. 13 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात चक्रवर्ती भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. त्याने शानदार गोलंदाजी करत आपल्या चार षटकांत 16 धावा देऊन एक विकेट घेतला होता.मात्र, आता दुखापतीमुळे तो मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे.
🚨 BIG BLOW FOR INDIA ❌
– Varun Chakaravarthy ruled out of the Afghanistan T20I series due to an injury. [Abhishek Tripathi]
Feel for him, just returned from injury but once again got injured. pic.twitter.com/xRHEgeIz73
— Johns. (@CricCrazyJohns) September 14, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता
अफगाणिस्तान टी20 मालिकेनंतर, भारतीय संघ जपानमध्ये 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. जर वरुण चक्रवर्तीची दुखापत गंभीर असेल आणि तो वेळेत तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेलाही मुकावे लागू शकते. मात्र, बीसीसीआयने त्याच्या दुखापतीच्या स्वरूपाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
वरुण चक्रवर्ती वारंवार होणाऱ्या दुखापतींशी झुंजतोय
35 वर्षीय वरुण चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपासून वारंवार होणाऱ्या दुखापतींशी संघर्ष करत आहे. आयपीएल 2026 दरम्यान त्याला पायाची दुखापत झाली होती त्यानंतर, त्याने बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (NCA) फिटनेसवर प्रक्रिया पूर्ण केली आणि जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत चक्रवर्तीने पुनरागमन केले होते. पण तिसऱ्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे त्याला त्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आणि पुन्हा एनसीएमध्ये परतावे लागले होते.