1204 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराटचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक!

1204 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराटचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक!

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले आहे.विराटच्या कारकिर्दीतील हे 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे.

विराट कोहलीने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत विराटच्या बॅटमधून शतक झळकले. आता 3 वर्षे 3 महिने 17 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने कसोटीत शतक ठोकले आहे.

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे 28 वे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सातव्यांदा तीन आकडी धावसंख्या गाठली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 75 व्यांदा शतक ठोकले आहे. चौथ्या दिवशी उपाहारानंतर विराटने 241 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 5 चौकार मारले. त्याने सर्वाधिक धावा विकेटच्या मध्यभागी धावून काढल्या.

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

गेली तीन वर्षे कसोटीत विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत होती. त्याने 2020 मध्ये 19.33 च्या सरासरीने 116 धावा, 20201 मध्ये 28.21 च्या सरासरीने 536 धावा आणि 2022 मध्ये 26.5 च्या सरासरीने 265 धावा केल्या. त्याला शेवटच्या 15 डावात अर्धशतकही करता आले नाही. या वर्षाची सुरुवात विराटसाठी चांगली झाली नाही. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विराटने 111 धावा केल्या होत्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीमुळेही तो त्रस्त झाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube