Wrestler Protest: बृजभूषण सिंह यांच्यासाठी ‘कही खुशी कही गम’ ; सुटका अन् आरोपपत्र एकाच दिवशी दाखल

Wrestler Protest: बृजभूषण सिंह यांच्यासाठी ‘कही खुशी कही गम’ ; सुटका अन् आरोपपत्र एकाच दिवशी दाखल

Wrestler Protest: कुस्तीपटूंनी गेल्या महिन्यात भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) या प्रकरणाची चौकशी करत होते आणि आज १५ जून रोजी राऊस एव्हेन्यूमध्ये (Rouse Avenue) या आरोपांवर आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात १ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु आता सुटका आणि आरोपपत्र एकाच दिवशी दाखल झाल्याने बृजभूषण सिंह यांची अवस्था ‘कही खुशी कही गम’ अशी झाली आहे.

त्याचवेळी पॉक्सो प्रकरणात (POCSO case) बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळत आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात पॉक्सो प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या अहवालात दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास बंद करत आहोत. पोलिसांच्या अहवालाची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जुलै रोजी ठेवली आहे.

दिल्ली पोलिसांनी आपल्या तपास अहवालात अल्पवयीन मुलाचे वक्तव्य आणि आतापर्यंतच्या तपासाबाबत आपला अहवाल दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने यापूर्वीच बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप मागे घेतले आहेत.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या तिच्या पहिल्या जबानीत अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाबाबत बोलले होते. दुसऱ्या निवेदनात, “माझी निवड झाली नाही, मी खूप मेहनत केली होती. मी डिप्रेशनमध्ये होते, त्यामुळे रागाच्या भरात मी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता” असे म्हणत अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप मागे घेतला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या महिन्यात 23 एप्रिल रोजी देशातील आघाडीचे तीन कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यास सुरुवात केले होते. यानंतर त्यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला, ज्यावर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube