WTC Final: टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराहनंतर आता हा अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर!
WTC Final: आयपीएल 2023 सीझनचे सामने सुरू आहेत. त्याच वेळी, यानंतर भारतीय क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तयारीला लागतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हलवर खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंजत आहे. उमेश यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडावे लागू शकते, असे मानले जात आहे. असे झाल्यास टीम इंडियासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
उमेश यादव आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये खेळणार का?
उमेश यादव आयपीएल 2023 हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर उमेश यादवला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावे लागले. उमेश यादव आयपीएल 2023 च्या आगामी सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल की नाही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही… पण जर तो दुखापतीतून सावरला तर तो कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीत दिसू शकतो.
जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरनंतर आता उमेश यादव…
उमेश यादवची दुखापत ही भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चांगली बातमी नाही, कारण भारतीय संघ आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय श्रेयस अय्यरसारखा खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळू शकणार नाही. सध्या भारतीय संघ व्यवस्थापन या दुखापतींच्या जागी बदली खेळाडूंच्या पर्यायांवर विचार करत आहे, मात्र उमेश यादवची दुखापत डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे… विशेष म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जूनपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सलग दुस-यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.