Nitesh Rane Speech in BJP Worker Meeting : सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र तक्रार करू नका, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) इशारा […]
Amol Mitkari replies Sanjay Mandlik : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठविली आहे तर दुसरीकडे […]
Lok Sabha Elections 2024 : राजकारण म्हटलं की कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकील याचा काहीच अंदाज नसतो. निवडणुकीत तर एकाच घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. आताच्या लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच राजकीय संघर्ष उडाला आहे. कुठे भाऊ विरुद्ध बहीण तर कुठे नणंद विरुद्ध भावजय अशा लढती होताना […]
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपातील मोठे नेते एकनाथ खडसे सध्या (Eknath Khadse) शरद पवार गटात आहेत. परंतु खडसे आता लवकरच भाजपात वापसी करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खडसे भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. […]
Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha Constituency : सध्या महायुतीत नाशिक मतदारसंघ अत्यंत कळीचा ठरला आहे. शिंदे गटाचा खासदार असताना या मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. या मतदारसंघात छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा (Chhagan Bhujbal) एकदा […]
Varsha Gaikwad Comment on MVA Seat sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटप (Mumbai News) जाहीर केलं. आघाडीचे नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सारेकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे चित्र वरवरचं ठरलं. कारण या जागावाटपानंतर विशेष करून काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले आहेत. तर […]
Ahmednagar Politics : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भारत राष्ट्र समितीच्या मोटारीला महाराष्ट्रात ब्रेक लागला आहे. राज्यात अनेक शिलेदारांनी या पक्षाची साथ सोडली आहे. आता आणखी एक मोठा धक्का अहमदनगर जिल्ह्यात बसला आहे. काही दिवसांपूर्वी थेट हैदराबादेत जाऊन बीआरएसचा झेंडा हाती घेणारे वजनदार नेते घनश्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला […]
Sanjay Raut warns Congress Leaders on Sangli Lok Sabha महाविकास आघाडीने काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. सांगलीसाठी काँग्रेसने अतोनात प्रयत्न केल्यानंतरही ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. यानंतर काँग्रेस नेत्यांनी बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून आता नगर दक्षिणेमध्ये राजकारण तापताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या (Lok Sabha Election) प्रचाराने वेग घेतला आहे. राजकारण म्हटलं की एकाच घरात परस्पर विरोधी पक्षांचे समर्थक असतात. असाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. मुलगा भाजपाचा उमेदवार आहे तर वडील काँग्रेसमधील मातब्बर नेते. इतकेच नाही तर त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद सुद्धा सांभाळले आहे. हे […]