- Home »
- Nanded
Nanded
चव्हाणांनी 25 वर्ष जोर लावून चिखलीकरांना विरोध केला… आता त्यांच्याच विजयासाठी मते मागावी लागणार!
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों… हा शेर जर कुठे अगदी चपखल लागू होत असेल तर तो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कडवट विरोधक. गेल्या जवळपास 25 वर्षांपासून दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर. यात कधी अशोक चव्हाण वरचढ ठरायचे […]
नांदेडच्या खासदारांची पहिली विकेट? डॉ. मीनल पाटील-खतगावकरांनी घेतली अमित शाहंची भेट
नांदेड : माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या स्नूषा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डाॅ. मीनल पाटील-खतगावकर (Dr. Meenal Patil-Khatgaonkar) यांनी आज (5 फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. शाह आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मीनल पाटील-खतगावकर आणि अमित शाह यांची भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
चव्हाणांच्या राजीनाम्याची मुहूर्तमेढ आठ महिन्यांपूर्वीच रोवली होती! शरद पवारांच्या नेत्याचा बडा दावा
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा राजकीय भूकंप झाला आहे. मात्र अशातच या राजीनाम्याची स्क्रिप्ट आठ महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती. अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. […]
Letsupp Special : भाजपचा ‘अशोक चव्हाणांवर’ डोळा; पण कट्टर काँग्रेसी गळाला लागणार का?
अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या […]