नांदेड : माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या स्नूषा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डाॅ. मीनल पाटील-खतगावकर (Dr. Meenal Patil-Khatgaonkar) यांनी आज (5 फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. शाह आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मीनल पाटील-खतगावकर आणि अमित शाह यांची भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा राजकीय भूकंप झाला आहे. मात्र अशातच या राजीनाम्याची स्क्रिप्ट आठ महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती. अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. […]
अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या […]