एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओखळ असून, भुजबळांना जर भाजपमध्ये घेतलं तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो.
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होतील.
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.