- Home »
- Vinod Tawade
Vinod Tawade
तावडेंच्या योजनेला फडणवीसांचा सुरुंग : निवृत्त अधिकाऱ्यांसाठी ‘खासदारकी’ स्वप्नच राहिली!
मुंबई : प्रशासन गाजवल्यानंतर राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी उत्सुक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात अपयश आले आहे. राजकीय पक्षांकडून विशेषतः भाजपकडून (BJP) या नव्या नेत्यांना उमेदवारीच मिळविता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. यात माजी आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Pardeshi), राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar), माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) […]
झिरो टू हिरो : आमदारकीचे तिकिट न मिळालेल्या तावडेंनी मोदींसह लोकसभेचे १९५ उमेदवार जाहीर केले…
(Vinod Tawde political journy) भाजपमध्ये हवेत उडणाऱ्या नेत्याचा फुगा कधी फुटेल, याच नेम नसतो. फुटलेला फुगा पुन्हा हवेत उडण्यासाठी हवा असतो संयम आणि सोबत निष्ठा. पक्षाने शिक्षा दिली तर ती आनंदाने स्वीकारायची. बंडाची भाषा करायची नाही. इतर पक्षांत जाण्याच तर विचारही करायचा नाही. मग तुमचा राजकीय वनवास संपण्याची जास्त शक्यता असते. असाच वनवास भोगलेले एक […]
Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : मोदी-शहा लोकसभेच्या रिंगणात
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज (2 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीमधूनच (Varanasi) निवडणूक लढविणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 34 केंद्रीय मंत्री यांनाही या पहिल्या […]
Chandigarh Mayor Election : मतपत्रिकेवर खाडाखोड केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली ; सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing: भाजपकडे (BJP) संख्याबळ नसताना चंदीगड (Chandigarh) महानगरपालिकेर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा चमत्कार घडवत आपला महापौर बसविला. परंतु निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी आपली चूक न्यायालयासमोर कबूल केली. […]
पंकजा मुंडे यांना भाजपनं काढून तरी टाकावं….
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नावापुरत्याच भाजपच्या नेत्या राहिल्या आहेत का? त्यांच्यापेक्षा कमी क्षमता असलेले महाराष्ट्रातील नेते आमदार-खासदार होत असताना पंकजा यांनाच पक्ष दूर का ठेवत आहे, असा प्रश्न त्यांच्याही मनात येत असेल. म्हणायला त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. पण प्रत्यक्षात त्यांना गेली पाच वर्षे साईडलाईन केल्याचे दिसून आले आहे. Rajya Sabha : “थोडं […]
तावडेंच्या आनंदावर सुप्रीम कोर्टाचे विरजण; चंदीगड महापौर निवडणुकीत सरन्यायाधीशांचा भाजपला दणका
चंदीगड : व्हिडीओमध्ये आम्ही जे काही बघितले ती लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही पुरते हादरुन गेलो आहोत. आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चंदीगड महापालिकेची सात फेब्रुवारी रोजी होणारी पहिली बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नवीन महापौरांच्या कामकाजावरही तूर्तास बंधने घालण्यात आली आहेत. […]
राणे, देसाई, वंदना चव्हाण ‘माजी’ होणार? देवरा, तावडे अन् पार्थ पवार खासदारकीच्या शर्यतीत!
मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
नितीश कुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्याची स्क्रिप्ट लिहिणारे ‘सात’ अदृश्य हात…
पाटणा : चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज (28 जानेवारी) एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदीही निवड करण्यात आली. गेल्या 10 वर्षात नितीशकुमार भाजपसोबत येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) सरकार स्थापन केले होते. त्यानंतर […]
मिलिंद देवरा, पार्थ पवार, विनोद तावडे ‘राज्यसभेच्या’ शर्यतीत… राणेंना ‘नारळ’ मिळणार?
मुंबई : नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसांतच निवडणूक जाहीर होणार आहेत. […]
मतदारसंघात 300 कार्यकर्ते अन् वेळापत्रक; एनडीएच्या उमेदवारांसाठीचा खास प्लॅन तावडेंनी सांगितला
Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी […]