‘ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ…’; अशोक चव्हाणांची थोरातांसह कॉंग्रेसच्या पराभूत नेत्यांवर टीका
Ashok Chavan : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळाले. भाजपला सर्वाधिक 132, शिंदेसेनेला 58 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यावर आता भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी बोचरी टीका केली.
‘महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक…’; ऐतिहासिक विजयानंतर फडणवीसांचे जनतेला पत्र
ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ झाले, त्यामुळं मला कुणी त्रास देऊ नका, अशी टीका चव्हाण यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला आहे. महायुतीच्या विजयात कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यात कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झाला. यानंतर आज माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या देशमुख बंधू, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर बोचरी टीका केली.
पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देणारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
चव्हाण म्हणाले की, लातूरमध्ये एक पडला आणि दुसरा निसटता निसटता कसातरी निघालाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तर नांदेड आणि भोकरच्या नावाने बोंबलून बोंबलून निघून गेले. ते कसेतरी ते केवळ 150 मतांनी निवडून आले. अन् हे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व करणार होते. आता त्या काँग्रेसमध्येच राहिलंय काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सगळे साफ झाले. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ झाले… त्यामुळं मला कुणी त्रास देऊ नका, अशी टीका चव्हाण यांनी केली.
भोकर मतदारसंघात श्रीजय यांचा दणदणीत विजय…
काहीच महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलं. तर त्यांची कन्या श्रीजया यांना नांदेडच्या भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला. भोकर मतदारसंघातून शंकरराव चव्हाण यांनी 20 वर्षे सातत्याने विजय मिळवून नेतृत्व केले. तेव्हापासून हा मतदारसंघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहीला. या मतदारसंघाचे नेतृत्व 2014 मध्ये अमिता चव्हाण, 2019 मध्ये अशोक चव्हाण यांनी केले. त्यानंतर यावेळी अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी निवडणूक लढवून कुटुंबाचा गड राखला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तिरुपती कदम निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत श्रीजया यांना 1लाख 33 हजार 187 मते मिळाली.