‘महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक…’; ऐतिहासिक विजयानंतर फडणवीसांचे जनतेला पत्र

  • Written By: Published:
‘महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक…’; ऐतिहासिक विजयानंतर फडणवीसांचे जनतेला पत्र

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने (Mahayuti) अभूतपूर्व यश मिळवलं. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. दरम्यान, या विजयानंतर देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहित आभार व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देणारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला 

विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने 149 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 132 जागांवर त्यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतर फडणवीसांना जनतेला पत्र लिहित राज्यातील जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांच्या समोर नतमस्तक होतो, अशा शब्दात आभार मानले.

फडणवीसांचे जशास तसे पत्र
प्रिय बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो.

Maharashtra Vidhan Sabha: राज्यात 26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट? चर्चांना उधाण, जाणून घ्या इतिहास 

मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अश्या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!

आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मा. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपलाच,
देवेंद्र फडणवीस

दरम्यान, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला  केवळ 49 जागांवर यश मिळालं. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या त्यामुळं फडणवीसचं मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आता सुरू झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube