शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार; जळगावमध्ये अनेकजण भाजपच्या वाटेवर

BJP vs Shiv Sena : जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात 13 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या वाटेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने फोनवरून बोलताना प्रवेशाबाबत माहिती दिली असून, मुहूर्त उद्या निश्चित होणार असल्याचं सांगितले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लड्डा यांच्या उपस्थितीत उद्या बैठक पार पडणार असून प्रवेशाची तारीख आणि ठिकाण निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे बंधूंच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार ; वकील गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं
त्यासोबतच पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. त्यापूर्वी जर हा पक्ष प्रवेश झाला तर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे, तर दुसरीकडे जळगावात भाजपची ताकद वाढणार आहे, ज्याचा फयदा त्यांना महापालिका निवडणुकीसाठी होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीची बहुमतानं सत्ता आली. 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर अनेक लोक भाजपमध्ये जात आहेत.