मोठी बातमी! मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साकिब नाचनचा मृत्यू, तिहार जेलमध्ये होता कैदेत…

मोठी बातमी! मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साकिब नाचनचा मृत्यू, तिहार जेलमध्ये होता कैदेत…

Terrorist Sakib Nachan dies : बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला कुख्यात दहशतवादी साकिब नाचनचा (Sakib Nachan) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ब्रेन स्ट्रोक (Brainstroke) आल्याने साकिबचा याचा मृत्यू झाला. सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital)उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्याची माहिती आहे. दरम्यान, साकिब नाचनचे मूळ गाव भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली आहे. त्याचा मृतदेह तिथे आणण्यात येणार असल्याने बोरिवली आणि पडघा दोन्ही ठिकाणी २०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले.

‘तो’ आरोपी आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; बंधू अन् अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप 

साकिब नाचन हा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी होता. त्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये एनआयएने त्याला पुन्हा आयसिस मॉड्यूलमध्ये अटक केली होती. त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते.मात्र, तिथे ब्रेन स्ट्रोक आल्याने सोमवारी पुढील उपचारांसाठी सबिकाला दीनदयाळ रुग्णालयात दाखल केले गेले होते. तिथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिब नाचन याचे बुधवारी निधन झाले. मात्र, याचा अधिकृत घोषणा उशिरा करण्यात आली. साकिब नाचनचा मृतदेह भिवंडीतील बोरवली गावात आणण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तिकीट बुकिंगपासून ते एटीएमपर्यंत 1 जुलैपासून 4 मोठे नियम बदलणार; जाणून घ्या सर्वकाही 

मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग
२००२-२००३ दरम्यान झालेल्या तीन मुंबई बॉम्बस्फोटांसंदर्भात साकिबचं नाव चर्चेत आलं.१ ९९० पासून साकिब तपास यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यावर दहशतवाद आणि हत्येचे किमान ११ खटले चालेले आहेत आणि तो सुमारे १५ वर्ष तुरुंगातही जाऊन आला आह. तो एकेकाळी बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष होता आणि नंतर तो संघटनेचा सरचिटणीस बनला होता. ३ ऑगस्ट २०१२ रोजी भिवंडी येथे विश्व हिंदू परिषदेच्या मनोज रायचा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता, त्यातही साकीब आरोपी होता. याशिवाय २००२ मध्ये गोरक्षकांचे वकील ललित जैन यांचीही हत्या करण्यात आली होती, त्यातही तो आरोपी होता.

एनआयएच्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत साकिबवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. साकिब नाचन हा दिल्ली-पडघा आयसिस मॉड्यूलचा एक महत्त्वाचा भाग होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube