Sanjay Raut : 50 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारला श्रध्दांजली; ईडीच्या भयाने फडणवीसही शिवसेनेत येतील

Sanjay Raut : 50 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारला श्रध्दांजली; ईडीच्या भयाने फडणवीसही शिवसेनेत येतील

Sanjay Raut : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र, अद्याप यावर निर्णय झाला नाही. दरम्यान, याचवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला. (Sanjay Raut Said Tribute to Shinde-Fadnavis government in next 50 days)

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटानं आज वरळीत शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात बोलतांना संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने फारच स्पष्ट आपला निकाल दिला. कोर्टाने सांगितलं की, एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकयादेशीर आहे. भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेनी निवडही बेकायदेशीर आहे. शिवाय राज्यपांलांची कृतीही कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली आहे. कोर्टाने सगळं काही बेकायदेशीर ठरवलेलं असतांना मग कायदेशीर आहे तरी काय? असा सवाल त्यांनी केला.

Kiran Mane: …अन् माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं; रितेश देशमुखच किरण मानेंशी खास कनेक्शन काय जाणून घ्या 

ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर आहे. कोर्टाने आपल्या निकालपत्रात सरकारला डिसमिस केलं. फक्त त्याच्यावर सही करण्याासठी ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं आहे. कोर्ट फासीची शिक्षा सुनावतं, पण फाशी देत नाही. कारण, त्याला जल्लादच लागतो. कोर्टाने या सरकारला फाशी दिली आहे. हे सरकार लवकर लटकणार असून पुढच्या 50 दिवसांत सरकारला श्रद्धांजली वाहावी लागले, असं राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, काल परवा तमिळाडूच्या एका मंत्र्याला ईडीने अटक केली. अटक केल्यावर ते रडले. पण आम्ही मात्र ईडीला रडवलेलं. आम्ही बाळासाहेबांचे चेले आहोत. इतके कच्चे आम्ही नाही. आम्हाला ईडीचा धाक दाखवू नका. तुमच्या सगळ्या कारवाया ह्या सुडबुद्धीने केल्या जात आहे. जर आम्हाला सुड घेता येत नसेल तर आम्हाला मावळे म्हणण्याचा अधिकार नाही. आम्ही नक्कीच याचा सूड घेऊ. आमचं सरकार आल्यावर आम्हीही कारवाया करू. आम्ही सत्तेत येताच नरेंद्र मोदी, अमित शाह शिवसेनेत दाखल होती. ईडीच्या भयाने फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असा सुचक इशारा त्यांनी दिला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube