बंदूक हातात घेत नाही पण… कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा कोण ?

Who is Madvi Hidma: गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांचा मोठा लीडर केशरराव उर्फ बसवा राजू (Basava Raju)याचा खात्मा करण्यात आलाय. परंतु कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा (Madvi Hidma) हा अजूनही मोकाट आहे. तो छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्रातील घनदाट जंगलात लपून सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करतो. अनेकांचा खात्मा झाल्यानंतर आता तो सुरक्षा दल, पोलिसांच्या रडारवर आहे. हा हिडमा नक्षलवादी कसा झाला ? तो सर्वाधिक घातक नक्षलवादी (Naxalite) का म्हटले जाते. आहे हे पाहुया…
कुख्यात महिलेकडून ट्रेनिंग, महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग
हिडमाचा जन्म दक्षिण सुकमातील पुवर्ती गावातला. तो 1996 ला नक्षलवाद्यांमध्ये आला. तेव्हा केवळ 16 वर्षांचा होता. तो राज्य कमिटीचा सदस्यही होता. त्याला कुख्यात महिला नक्षलवादी सुजाता हिने ट्रेनिंग दिलेली आहे. तीही बस्तरच्या जंगलात. तिने हिडमाला बंदूर आणि इतर हत्यार चालविण्याची ट्रेनिंग दिलेली आहे. सुजाता ही विरप्पनप्रमाणेच बस्तरच्या जंगलात राज्य करत. 2024 मध्ये सुरक्षा दलाने तिला तेलंगणात अटक केलेली आहे. प्रशिक्षणात हिडमाची पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात गडचिरोलीत झालेली. हिडमा हा नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीजीएलए) बटालियन एकचा प्रमुख आहे. याशिवाय, तो माओवादी स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य देखील आहे. हिडमाला अनेक भाषा येतात. तो तेलुगू, तमिळ, मराठी, हिंदी आणि गोंडवी या भाषात पारंगत आहे. 2019 मध्ये रवुला श्रीनिवास रामण्णा यांच्या मृत्युनंतर हिडमाला नक्षलवाद्यांचा कमांडर बनवण्यात आले.
जवानांवर सर्वाधिक घातक हल्ल्यातील मास्टरमांइड
माड़वी हिड़मा हा अनेक घातक नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जोता. तो स्वत: बदुंक चालवत नाही. तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि हल्ल्याची रणनिती आखतो. तो हल्ल्यांचे व्हिडिओ त्यांचे विश्लेषण करतो. 2010 ते 2023 या कालावधीत त्याने जवानांवर हल्ला करण्याचे अनेक प्लॅनिंग केलेले आहेत. आतापर्यंत त्याने तब्बल चाळीस हल्ले केलेले आहे. त्याची दहशत बीजापूर, सुकमा आणि दंतेवाडी भागातच आहे.
एकाच वेळी 76 जवान शहीद
माडवी हिडमाने सर्वात मोठा हल्ला हा 2010 मध्ये केला होता. सीआरपीएफची 62 वी बटालियन हे ताडमेटच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांकडे जवानांवर हल्ला झाला. त्यात तब्बल 76 जवान शहीद झाले होते. बस्तरच्या इतिहासात हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्याचा मास्टमाइंड होता माडवी हिडवा. तो 2013 चा झीरम घाटी हल्ला आणि 2017 चा सुकमा बुर्कापाल हल्ल्यासह अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जाते. सुकमा हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते. त्याच्यावर विविध यंत्रणांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.
माडवी हिडमाला पकडणे सोपे का नाही?
माडवी हिडमाची सुरक्षाही दहशतवादी संघटना आयएसआयएससारखी आहे. त्याच्या सुरक्षेसाठी तब्बल 250 नक्षलवादी आहेत. म्हणजे मुख्यमंत्री, पंतप्रधानापेक्षा ही त्याच्या जीवाला नक्षलवाद्यांकडून जपले जाते. त्या नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत. सर्च ऑपरेशन सुरू झाल्यानंतर तो काही क्षणामध्ये जागा बदलतो. त्यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी असलेले नक्षलवादी हे सुरक्षा दलाच्या पथकांना घेरते. तोपर्यंत तो पळालेला असतो. त्याचा शोध घेतानाच अनेक जवानांना प्राणाची आहुती द्यावी लागलीय. बसवराजूला संपविल्यानंतर आता सुरक्षा दलांच्या रडारवर हिडमा आहे. परंतु त्याची कुणीच माहिती देत नाही. अनेक दिवसांपासून त्याला कुणी पाहिलेले नाही. त्याने आता बस्तर-तेलंगणा सीमेवरील जंगलात तो असल्याचे सांगितले जाते. त्या ठिकाणी त्याची शोध मोहिम सुरक्षादलांकडून सुरू आहे. माडवी हिडमाला पकडला तर नक्षलवाद संपविण्यासाठी सरकारला खरे यश मिळेल.