हाती कमळ अन् पिचडांच्या सत्तेचा बुरुज ढासळला
भाजपमधील पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले. पण कमळ हाती घेणे पिचडांना फायद्याचे ठरले नाही. आमदारकी गेलीच पण स्थानिक निवडणुकांमध्ये पिचडांना राष्ट्रवादी हिसका देत आहे. पिचडांना अद्दल घडविणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एका सभेत बोलवून दाखविले होते. आता हे खरे ठरत असल्याचे दिसत आहे.