तेलंगणाच्या डीजीपींना रेवंत रेड्डींची भेट नडली, निवडणूक आयोगाने केलं निलंबित

तेलंगणाच्या डीजीपींना रेवंत रेड्डींची भेट नडली, निवडणूक आयोगाने केलं निलंबित

Telangana DGP Anjani Kumar suspended : पाच राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेतून काँग्रेसला मोठ यश मिळालं आहे. बीआरएसला (BRS) धुळ चारत काँग्रेसने तेलंगणात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मानलं जातंय. पण रेवंत रेड्डी यांची भेट घेणं तेलंगणाच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार (DGP Anjani Kumar) यांच्या अंगलट आलंय.

तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, तेलंगणा डीजीपीसह राज्य पोलिस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल अधिकारी महेश भागवत यांनी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डीजीपींनी त्यांना पुष्पगुच्छही दिला होता.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मोठा उलटफेर, उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव

डीजीपीच्या रेवंत रेड्डी यांच्या भेटीनंतर निवडणूक आयोगाची कारवाई
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना डीजीपींच्या या बैठकीनंतर निवडणूक आयोगाची कारवाई समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी (3 डिसेंबर) जाहीर झालेल्या मतमोजणीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला तेलंगणामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. तेलंगणात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे.

Telangana Election : तेलंगणात विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?

तेलंगणात संध्याकाळी 6 च्या सुमारास झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने 29 जागा जिंकल्या होत्या आणि 35 जागांवर आघाडीवर होती. विजयाच्या शक्यतेने पक्ष समर्थक प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, डीजीपीची रेवंत रेड्डी यांच्यासोबतची बैठक चर्चेत आली. तेलंगणाच्या निकालात यावेळी बीआरएसला धक्का बसला आहे. आतापर्यंत BRS 22 जागांवर आघाडीवर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube