…तर मी उमेदवारी मागे घेईल; निकमांच्या बिनबुडाच्या प्रचारावर वळसे पाटलांचं थेट आव्हान
मंचर : विधानसभेसाठी पार पडणाऱ्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असतानाच आंबेगाव विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) विरोधी उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे. ते पिंपरखेड (ता.शिरूर) येथे मतदारांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं
…तर मी उमेदवारी मागे घेईल – वळसे पाटील
उपस्थितांना संबोधित करताना वळसे पाटील म्हणाले की, विरोधीपक्षातील उमेदवार देवदत्त निकम माझ्यासोबत संपूर्ण तालुका फिरले. मात्र, आता तेच जनतेला विचारत आहेत की, वळसे पाटलांनी 35 वर्षात काय केलं? खरे तर, जनतेनेच त्यांना उत्तर द्यायला हवे. वळसे पाटलांना ईडी, सीबीआय, पोलिसांकडून अटक होणार होती म्हणून त्यांनी शरद पवारांची साथ सोडली असा ते अपप्रचार करत आहेत. परंतु, मला एकही नोटीस आलेली नसून, निकमांनी नोटीस दाखवल्यास मी निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेईल.
वळसे पाटलांची ताकद दुपटीने वाढली; मोठ्या उद्योजकाने उचलला विजयाचा ‘विडा’
आजही पवारांचे फोटो सर्व ठिकाणी आहे तसेच
मी राज्याच्या राजकारणात बदल झाल्यापासून शरद पवारांच्या विरोधात एकही शब्द बोललो नाही. बोलणार ही नाही. मंत्रालयातील कार्यालय, भीमाशंकर कारखान्यात, शरद बँकेत आजही पवार साहेबांचे फोटो आहेत. ज्यांनी मला इतक्या वेळा संधी दिली त्यांच्याबद्दल कृतघ्न होऊन लगेच त्यांचे फोटो काढून टाकले नाही. माझी ती संस्कृती नाही. काहींना मी भरपूर देऊन ही त्यांनी माझे घरातील फोटो काढून अडगळीत टाकले ही त्यांची संस्कृती आहे, असा टोला उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी लगावला.
Video : मोठं मोठी कामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटलांमध्येच; आढळरावांची तुफान बॅटिंग
याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, शरद बँकेचे संचालक पांडुरंग पवार, माजी उपसभापती बाळशिराम ढोमे, शिवसेनेचे राम गावडे, गणेश जामदार, योगेश थोरात, बाबाजी निचित, सरपंच राजेंद्र दाभाडे, मेजर बळवंत बोंबे बाबुराव राक्षे आदी उपस्थित होते.