- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप
Supriya Sule on Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन मंजूर आहे. मनी लॉंड्रिग गुन्ह्यात मलिक हे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच मलिक यांच्या जामीनावर […]
-
कारागृहातून बाहेर येणारे नवाब मलिक कोणत्या पवारांची साथ देणार?
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट सरसावले आहेत. मलिक यांच्या जामीनाचा दोन्ही गटाच्या नेत्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. तब्बल […]
-
शरद पवारांबरोबरच्या खासदारांचा वॉकआऊट; तटकरे विरोधी बाकावरच राहिले
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी दोन्ही गटाची पहिली परीक्षा ही लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेले एकमेव खासदार सुनील तटकरे हे सत्ताधारी बाकावर बसले नाहीत. ते शरद पवार गटातील चार खासदारांबरोबर विरोधी बाकावर बसले होते. पण मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शरद पवारांबरोबर असलेले […]
-
पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून स्तनपानविषयक जनजागृती; रोटरी सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम
अहमदनगरः स्तनपानविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. या वर्षाची थीम ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर वर्किंग वुमेन’ ही आहे. हा धागा धरून संपूर्ण सप्ताह विविध मार्गदर्शनपर व्याख्यान, नवीन मातांना […]
-
एकनाथ खडसेंना नसते धंदे कुणी सांगितले? मंत्री गिरीश महाजनांनी सुनावले !
Girish Mahajan : उद्धव ठाकरे यांनीच भाजपबरोबरची युती तोडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत केला होता. परंतु राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी हा दावा खोडून काढला. नरेंद्र मोदी यांनी अर्धसत्य सांगितले असल्याचा आरोप केला होता. त्याला आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उत्तर दिले आहे. (Girish-Mahajan-reaction-on-Eknath-Khadse) एकनाथ […]
-
…तब्बल सहा तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरुप सुटका !
Parbhani News : आजीसोबत शेतात गेलेला चार वर्षांचा चिमुरडा उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल सहा तास चाललेल्या बचाव कार्याला यश आले. बोअरवेलमध्ये पडलेला चिमुरड्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर बचाव कार्यातील पथकासह ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तर त्याचे कुटुंबियाला आनंदाला पारावार उरला नाही. ( parbhani child stuck in the borewell for […]
-
Nitin Desai Suicide Case : इसीएल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह चौघांची कसून चौकशी
Nitin Desai Suicide Case : कलादिग्दर्शक, एन. डी. स्टुडिओचे नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी इसीएल (ECL) फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तीन अधिकारी यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहे. या चौघांचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना पुन्हा 11 ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता चौकशीसाठी […]
-
अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाचा अनिल गोटे (Anil Gote) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाचे कार्यालय सोडले. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटामध्ये जोरदार चकमक झाली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचे भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप […]
-
अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार?
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. तर काही माजी आमदार, पदाधिकारी ही अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. त्यामुळे गोटेही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील […]
-
जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन कचाट्यात ! इडीने काढले समन्स
रांची: सरकारी जमीन विक्री घोटाळ्यात आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही (Hemant Soren) अडचणीत आले आहेत. त्यांना इडीने नोटीस पाठविली असून, 14 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहावे राहावे लागणार आहे. जमीन घोटाळ्यात व्यावसायिक विष्णू अग्रवाल, अधिकारी भानुप्रताप प्रसाद यांनी ईडीच्या चौकशीत हेमंत सोरेन यांचेही नाव घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. बरियातू येथील एका […]









