मणिपूरसारख्या गोष्टी अलिकडे महाराष्ट्रात घडतील अशी चिंता वाटायला लागलीय; शरद पवारांचे मोठे विधान
Sharad Pawar On Narendra Modi: नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित सामाजिक एेक्य परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठे विधान करत चिंता व्यक्त केलीय. मणिपूरसारख्या (Manipur) गोष्टी अलिकडे महाराष्ट्रात घडतील अशी चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केलीय.
नरहरी झिरवळांच्या मनातही चलबिचल ? सुनील तटकरेंच्या महत्त्वाच्या बैठकीलाच मारली दांडी
मणिपूरमधील हिंसाचाराबाबत शरद पवार म्हणाले, या गोष्टीवर देशाच्या पार्लंमेंटमध्ये चर्चा झाली नाही. मणिपूरचे विविध धर्मांचे जातीचे लोक आम्हाला भेटायला दिल्लीला आले. पिढ्यान्, पिढ्या एकत्र असलेला लहानशा प्रांत अस्वस्थ झाला. दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरे पेटवली. शेती उद्धवस्त झाली स्त्रीयांवर अत्याचार केले. ते एकमेंकाशी बोलायला तयार नाही. एेवढे मोठे संकट एका राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्याची जबाबदारी ही त्याला सामोरे जाण्याची. लोकांना विश्वास देणे, कायदा-सुव्यवस्था जतन करणे. पण दुर्देवाने आजच्या राज्यकर्त्याने त्याच्याकडे ढुंकणही पाहिले नाही. आज अखेर एेवढे मणिपूर येथे एेवढे झाल्यानंतर पंतप्रधानांनी आपण तिकडे जावे, लोकांना दिलासा द्यावा हे त्यांना वाटले नाही, असा निशाणा पंतप्रधानांवर साधलाय.
मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व, 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेणार; जरांगेचा सरकारला इशारा
आजबाजूला राज्यात काही घटना घडल्या. कर्नाटकमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे अलिकडेच महाराष्ट्रात असे काही घडले का अशी चिंता वाटायला लागली. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे युगपुरुष होऊन गेले आहे. त्यांनी समाजाचा विचार केला, असे पवार म्हणाले. देशातील लोकांना चुकीच्या मार्गावर न्यायचे असे करणाऱ्या काही वर्ग आहे, असे ते म्हणाले.
दिल्लीतील राज्य मोगलांचे होते. देवगिरीत यादवांचे राज्य म्हणून ओळखे जाते. परंतु छत्रपती शिवाजीराजांचे राज्य हे रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात. हिंदवी स्वराज्य आहे. परंतु त्यांच्या कालखंडामध्ये काही लोकांनी त्यांना विरोध केला. राज्याभिषेक करण्यासाठी भूमिका सांगण्यात आले. काही स्थानिक समाजाच्या लोकांनी राज्यभिषेक करण्यासाठी विरोध केले. उत्तरेकडून कुणाला बोलवून त्यांच्या हस्ते पूजा करावी लागली आहे. असा धक्का देणारा वर्ग समाजामध्ये आहे. दुर्देवाने आजही असे कुठेना-कुठे बघायला मिळाले, असे पवार म्हणाले.