Video : कुमारस्वामी तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी; भर पत्रकार परिषदेत काय घडलं ?

  • Written By: Published:
Video : कुमारस्वामी तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी; भर पत्रकार परिषदेत काय घडलं ?

H D Kumaraswamy Hospitilised in Bengaluru: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड मंत्री एचडी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) हे रविवारी पत्रकार परिषदेत होते. भाजपचे नेते काँग्रेसच्या (Cogress) कारभारावर आरोप करत होते. त्याचवेळी कुमारस्वामी यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला. हा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्यांनी नाकाला रुमाल लावला. तरीही रक्तस्राव सुरूच राहिल्याने तातडीने त्यांना बेंगळुरुमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.



मणिपूरसारख्या गोष्टी अलिकडे महाराष्ट्रात घडतील अशी चिंता वाटायला लागलीय; शरद पवारांचे मोठे विधान

राज्यातील काँग्रेसच्या कारभाराबाबत भाजप आणि जेड्यू नेत्यांची एक बैठक बेंगळुरूत झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी, राज्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक उपस्थित होते. कर्नाटमधील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथारिटी झालेल्या घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चर्चा झाली. त्यानंतर सर्वजण पत्रकार परिषद घेत होते.

नरहरी झिरवळांच्या मनातही चलबिचल ? सुनील तटकरेंच्या महत्त्वाच्या बैठकीलाच मारली दांडी


भर पत्रकार परिषदेत काय घडलं ?

भाजप अध्यक्ष विजयेंद्र हे माध्यमांशी संवाद साधत होते. त्यांच्या पाठीमागे एच. डी. कुमारस्वामी उभे होते. त्याचवेळी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. कुमारस्वामी हे रुमालाने रक्तस्त्राव थांबवत होते. पण रक्तस्राव थांबला नाही. ते रक्त त्यांच्या शर्टवरही पडले होते. ते पांढरा शर्ट घालून असल्याने हे रक्त दिसत होते. त्यावेळी सर्वजण गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी हा घटनास्थळी आला. ते वडिलांना घेऊन खासगी हॉस्पिटलमध्ये गेला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, घाबरण्यासाठी सारखे काही नाही. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube