- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
राजू शेट्टी यांनी सांगितले लाचखोरांचे रेटकार्ड : ऐकून बसेल धक्का
राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या लाचखोरीचे प्रकरणे अनेकदा उघडकीस येतात. आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या विभागातील लाचखोरांचे रेटकार्ड उघडकीस आणले आहे. शिक्षण, महावितरण, नगरविकास, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांकडून पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांची लाच घेतात. शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. सत्तासंघर्ष : निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष […]
-
सत्ताकेंद्र ताब्यात घेणाऱ्या राहुल जगतापांना पवारांकडून आणखी ताकद
Rahul Jagtap: श्रीगोंद्यातील एक-एक सत्ताकेंद्र ताब्यात घेणारे माजी आमदार राहुल जगताप यांची ताकद आता वाढली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना आणखी ताकद दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल जगतापांवर मोठा विश्वास दाखविला आहे. त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड केली आहे. मध्यंतरी जगतापांबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. […]
-
पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला
Devendra Fadnavis On Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्ष हा साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादीत असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचले. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी फौजदाराचा हवालदार झालाय असे सांगत फडणवीसांना डिवचले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाची दोनवेळा फसवणूक केली […]
-
सीएसआरडीमध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतींना देणार उजाळा
चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान व चतुरस्त्र कलाकार स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी व सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी ११ मे रोजी सायंकाळी पाच वाजता सीएसआरडी संस्थेत आठवणीतील अमरापूरकर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
-
Karnataka Election: प्रचाराच्या तोफा थंडविल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आले अडचणीत
Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर दिसून येत आहे. त्यात काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी झाली आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफाही थंडविल्या आहेत. त्यानंतर एकमेंकावर जोरदार कुरघोडी सुरू आहेत. त्यात आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे अडचणीत आले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाला ईडीचा दणका ! […]
-
सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांना ईडीचा दणका; तब्बल 41 कोटींची मालमत्ता जप्त
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला (Zavareh Soli Poonawala) यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या मुंबईतील सीडे हाऊसमधील 41. 64 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तीन स्थावर मालमत्तावर ही कारवाई झाली आहे. The Enforcement Directorate (ED) seized three immovable properties located at Ceejay house, Worli, Mumbai worth Rs 41.64 Crore […]
-
दंगलप्रकरणी नऊ आरोपींना अटक ; गावात दुसऱ्या दिवशीही बंदोबस्त
Ahmednagar: नगरपासून जवळ असलेल्या जेऊर गावात देवी बायजामाता उत्सवादरम्यान रविवारी रात्री दंगल झाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची […]
-
Raj Thackeray यांनी कर्नाटक निवडणुकीवर भूमिका का बदलली ? नवीन ट्वीट वाचा
Raj Thackeray On Karanatak Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दहा मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. मराठी भाषिक असलेल्या भागात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रचार करण्यात आला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट करत कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु ट्वीटमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत लिहिताना राज ठाकरे यांनी […]
-
राम शिंदे-रोहित पवारांना संचालक फुटण्याची भिती; सभापतीपदाची तारीख ठरली
Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत, जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या जोरदार राजकारण पेटले होते. पण मतदारांनी एकाच्या बाजूने कौल दिला नाही. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी नऊ असे समसमान संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे राजकारणात आणखी रंगत आली आहे. कोणत्या गटाचे सभापती-उपसभापती होणार याबाबत उत्सुकता लागली […]
-
शिर्डीचे रुप पालटणार ! सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण
Shirdi : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा आराखडा साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मियता वृद्धिंगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी […]









