राहुल गांधी सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर खरं बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. राहुल गांधी नेहमी वस्तुस्थिती मांडत आले. नोटाबंदी असो, चीनसोबतच वाद असो किंवा जीएसटी असो. त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. अशी टीका आज काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना […]
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा […]
MPSC Exam News : काही दिवसापूर्वी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीवेळी नॉनक्रिमिलेअरच्या कारणाने अनेक उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. पण राज्य सरकारने जाहिरातीच्या पुढील वर्षातील नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असा अध्यादेश काढून उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने […]
Vikram Kale : विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार विक्रम काळे हे आज शिक्षकांच्या मुद्यावर विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन करत होते, त्याचवेळी समोरून मंत्री दीपक केसरकर आले आणि त्यांनी विक्रम काळे यांना सुनावले. त्यामुळे विक्रम काळे विरुद्ध दीपक केसरकर यांच्या वादाची चर्चा आज विधानभवनात रंगली राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक नाहीत, वरिष्ठ महाविद्यालयांत […]
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले […]
खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आपल्या विरोधकांना दिलेल्या आव्हानामुळे तर ते कायम चर्चेत येतात. अशीच एक घटना आज पुन्हा घडली आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे देखील कायम एकमेकांच्या समोर येत असतात, आज पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप […]
“भाजप आणि मनसे एकत्र येऊ नये म्हणून काही लोकांनी २०१४ साली २०१७ साली काही चाली खेळल्या आहेत. कारण हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले तर हे दोन पक्ष एकत्र आले तर आपलं काय होईल याची उद्धव ठाकरे यांना भीती आहे.” असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. काल विधिमंडळ परिसरात […]
सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या युद्धाभ्यास चालू आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा उत्तर कोरियाने संपूर्ण जगाला घाबरवले आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशानुसार उत्तर कोरियाने शुक्रवारी पाण्याखाली आण्विक हल्ला करणाऱ्या ड्रोनची चाचणी केली, अशी माहिती वृत्तसंस्था केसीएनएने दिली आहे. हे ड्रोन इतके धोकादायक आहे की त्याच्या हल्ल्यामुळे समुद्रात त्सुनामी येऊ शकते. युद्धाच्या काळात शत्रूच्या […]
“एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते……याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. […]
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमा समद्रातल्या मजारभोवतालचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाच्या निगराणीखाली मजारीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी माहीमा समुद्रातल्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच दाखवला होता. त्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. सभेनंतर काही कार्यकर्ते या मजार परिसरांत पोहचले होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या […]