“आता हे खरं उखाड दिया पण काही जण एका महिलेच्या घरावरती हाथोडा…” उद्धव ठाकरे यांना मनसेचा खोचक टोला
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमा समद्रातल्या मजारभोवतालचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाच्या निगराणीखाली मजारीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी माहीमा समुद्रातल्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच दाखवला होता. त्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडण्याचा इशारा प्रशासनाला दिला.
सभेनंतर काही कार्यकर्ते या मजार परिसरांत पोहचले होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेने घटना टळली. अखेर आज सकाळीच सुर्याची पहिली किरण पडताच महापालिकेचे पथक जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने माहीमा समुद्र परिसरात दाखल झालं होतं. कागदोपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित मजार जुनी आणि नोंदणीकृत असल्याचं स्पष्ट झाल्याने मजार पाडण्यात येणार नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय. मात्र मजारभोवतालच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा मारला आहे.
राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा…
माहिम मध्ये ही कारवाई झाल्यानंतर आता अनेक टीका टिप्पण्या समोर येत आहेत. यातच मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलाच टोला लगावला आहे. एक फोटो शेअर करत ‘हिंदुत्वाचं ढोंग नाही “Results” देणारं खर हिंदुत्व !!’ असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये असं लिहिलं आहे की, ‘काही जण एका महिलेच्या घरावरती हाथोडा चालवून मर्दपणा दाखवत होते!आता हे खरं उखाड दिया’ अशी खोचक टीका अमेय खोपकरांनी केली आहे.
हिंदुत्वाच ढोंग नाही "Results" देणारं खर हिंदुत्व !! pic.twitter.com/Y9isA5ZEBG
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 23, 2023
दरम्यान भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या माहिम येथील अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये काल या अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. माहीममधील मजारीच्या अनधिकृत बांधकामावर जलद कारवाई करत हातोडा मारणाऱ्या गृहमंत्री देवेंद्रजी व खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन, असे म्हणत त्यांनी राज्यातील सरकाचे आभार मानले आहेत.