Pakistan Hindu Temple: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी एका हल्लेखोर टोळीने दक्षिण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या घरांच्या जवळपास हल्ला केला. सीमा हैदरला पाकिस्तानात परत […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सर्व अकरा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेवर मतदानाची गरज नाही. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मतदान होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार […]
Maharashtra Monsoon Session 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात जोरदार खडाजंगीने झाली. याचा प्रत्यय विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच आला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विधानसभेत ओळख करुन देताना विरोधकांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना चांगलेच चिमटे काढले. दरम्यान विधानसभेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करुन […]
Onion Price: टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने ‘बफर स्टॉक’साठी 20 टक्के अधिक म्हणजे एकूण 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. यासाठी लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा ठेवला जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित सिंग यांनी आज (रविवार) सांगितले. 2022-23 […]
Kidney problem : पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळतो. मात्र या ऋतूत आजारांचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात संसर्ग अधिक वेगाने पसरतो, ज्यामुळे किडनी देखील खराब होऊ शकते. त्यामुळेच या मोसमात किडनीच्या रुग्णांची संख्या अधिक असते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की पावसाळ्यात हवा, पाणी आणि अन्नामध्ये अधिक बॅक्टेरिया आढळतात. अशा स्थितीत अन्नात थोडीशी गडबड देखील अन्न विषबाधा आणि अतिसाराचे […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आणि सरकारच्या अपयशाचा पाढा एका पत्राद्वारे मांडला. आज झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नव्हता पण एकेकाळी विरोधी पक्षनेते असलेल्या सहा नेत्यांनी चहाचा भुरका एकत्रित घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे चहापान ऐतिहासिक ठरले. मुख्यमंत्री एकनाथ […]
Maharashtra Monsoon Session 2023 :विरोधी पक्षांच्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे. आम्ही बहुमताच्या जीवार कामकाम रेडून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील मान आणि सन्मान देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाकडून एक पत्र सरकारला देण्यात आलं […]
Maharashtra Monsoon Session 2023 : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आले आहे. मी पहिल्यांदा असे पाहिले की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी पत्राऐवजी ग्रंथच दिला आहे. पण आमची सर्व गोष्टीवर चर्चा करण्याची […]
INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये शेरे ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे हमरनप्रीत कौरच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाने लक्ष्य दिले होते. पण टीम इंडिया 113 धावांवर गडगडली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने […]