नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्षांतील नेत्यांवर ईडी-सीबीआयने (CBI) छापा टाकले आहेत. यामध्ये अनेक नेत्यांना जेलमध्ये जावे लागले आहे. दिल्लीतील आपच्या चार मोठ्या नेत्यांवर ईडीने (ED) कारवाई केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा देखील समावेश आहे. यावरुनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार […]
नवी दिल्ली – मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह ट्विट्स डिलीट केल्याची सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशभरात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या भाषणावरुन माफी मागावी अशी मागणी गेल्या काही […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज निधन झाले आहे. बापटांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सर्वंच स्तरातून गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली जात आहे. पुण्यातील (Pune News) एका भाजप कार्यकर्त्यांने बापटांच्या आठवणींना उजाळा देत कसबा पोटनिवडणुकदरम्यानचे (Kasba byelection) एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. […]
मुंबई : विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य मिळाले होते. नॅट सीवर ब्रंटच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. नॅट सीव्हर ब्रंटने 55 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. त्याचवेळी राधा यादव आणि जेस जोनासेन यांनी दिल्ली कॅपिटल्ससाठी 1-1 अशा विकेट घेतल्या. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राजघाटावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर उद्या सोमवारी काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यासाठी संसदेत पोहोचणार आहेत. याच अनुषंगाने काँग्रेसने […]
(विष्णू सानप – लेट्सअप टीम) पुणे : गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात जी उलथापालत होत आहे ते पाहता कधी काय होईल याचा काही नेम नाही. निष्ठेंच्या शपथा घेणारे आणि वर्षानुवर्ष सोबत असणारे सहकारी देखील रात्रीत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. यामुळे राजकारण्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय लावायचा हा प्रश्न पडतो. राजकारणात कुठल्याही […]
नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या (Ahmednagar District Bank Election) चेअरमन पदाच्या निवडणुकीत चुकीची गोष्ट घडली आहे. यामध्ये काय घडलं? काय नाय घडलं? कोणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही. त्यांना असा झटका देणार की दहा पिढ्या त्याला आठवलं पाहिजे, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
नंदुरबार : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आज देशभरात मोदी सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. राजधानी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महात्मा गांधींच्या समाधीसमोर सत्याग्रह (Congress satyagraha) होणार होता, पण दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. यानंतर काँग्रेसने सत्याग्रहाची जागा बदलली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी […]