छत्रपती संभाजीनगर : अमित शहा पुण्यात आल्यावर म्हणाले की सत्तेसाठी आम्ही काँग्रेसची तळवे चाटत होतो मग तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचे काय चाटत आहात? चांगले चाललेले सरकारे फोडायची, पाडायची. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकार पाडले आणि तुम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी तुम्ही नितीश कुमार यांचे काय चाटत होतात? असा सवाल शिवसेना […]
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या हुकुमशाहीविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. सगळे मित्रपक्ष या यात्रेत सहभागी झाले आणि यशस्वी पदयात्रा झाली. पदयात्रेतून महागाई, बेरोजगारीच्या मुद्दे मांडले गेले. लोकांना यावर जागृत केले गेले. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी आणि मोदींचा संबंध काय असा सवाल केला पण त्यांचं भाषण काढून टाकण्यात आले. परदेशात गेल्यावर इथल्या […]
यवतमाळ : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील (Kalaram temple) पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje) यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरुन मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangha) अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत […]
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली होती. यापुढे मतांसाठी आपण कोणाला लोणी लावणार नाही, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कंबर […]
विजयपूर : सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून (Namibia) आणलेला ओबान नावाचा चित्ता (cheetah) कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) बाहेर पडून एका गावात घुसला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण होते. माहिती मिळताच वनविभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून ओबनचा शोध सुरू आहे. फेब्रुवारीमध्येच या चित्त्यांना मोठमोठ्या बंदोबस्तातून मोकळ्या जंगलात सोडण्यात आले होते. हा चित्ता विजयपूर जिल्ह्यातील […]
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 483 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 317 रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही महिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 483 रुग्ण पॉझिटिव्ह […]
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील बिघडलेल्या राजकीय वातावरणाचा फटका क्रिकेटला बसत आहे. आशिया चषकाबाबत (Asia Cup 2023) दोन्ही देशांमध्ये आधीच वाद सुरू आहे आणि आता 50 षटकांच्या विश्वचषकाबाबत (World Cup 2023) आलेल्या बातम्यांमुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. पाकिस्तान संघ या वर्षाच्या अखेरीस होणार्या वनडे विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही. […]
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजारीशी झुंज देणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज 73 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे आणि गिरीश बापट असे एक अनोखं नातं होतं. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त […]
अहमदनगर : महापालिकेत (Ahmednagar Municipality) आज आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) यांनी विशेष महासभा आयोजित केली होती. या सभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे १३८७ कोटी ७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर १२४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याची कागदपत्रं मी देणार आहे. निवडणुकीच्या आधी सादर […]