कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]
मागीलवर्षीच्या शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचे पैसे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या साखरकारखान्याने दिले नसल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहे. 30 जून पर्यंत जर उसाच्या बिलाचे पैसे दिले नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या साखरकारखान्यावर 1 जुलैपासून रयतक्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते. (Pay the sugarcane bill, […]
जूनमध्ये आतापर्यंत आगाऊ कर वसुलीत चांगली वाढ झाली आहे. या आधारावर असे म्हणता येईल की आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा चांगला असणार आहे. चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. आतापर्यंत, […]
प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट आदिपुरुष चित्रपटगृहांमध्ये चांगलाच धमाल करत आहे. या चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये जगभरात 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत आहे. रविवारी, 18 जून रोजी, चित्रपटाने थिएटरमध्ये चांगला व्यवसाय केला आणि भारतात जवळपास 64 कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जाते. हा सोमवार, 19 जून, आदिपुरुषांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आठवड्याच्या […]
Weather Update: बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. आता या वादळाचा प्रभाव राजस्थान, आसाम तसेच इतर राज्यांमध्ये दिसून येत आहे. राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे, तर आसाममधील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशात पावसाने दडी मारल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला आहे, मात्र असे असतानाही काही राज्यांमध्ये उष्णतेची प्रक्रिया सुरूच आहे. (weather-update-biparjoy-19-june-2023-rajasthan-assam-delhi-ncr-uttar-pradesh-bihar-jharkhand) हवामान विभागाने […]
Ashes Series 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रसिद्ध अॅशेस मालिका सुरू आहे. बर्मिंघम कसोटीने मैदानातील दोन बड्या शत्रूंमधील लढाई सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात 393 धावा केल्यानंतर इंग्लंड संघाने पाहुण्या संघाला 386 धावांत गुंडाळून 7 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने इंग्रजांना खूप त्रास दिला. तो काही केल्या आऊट होत नव्हता त्यासाठी इंग्लिश कर्णधाराने […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या… यावेळी बोलतांना कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका […]
Ashes Series 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथे खेळला जात आहे. रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 386 धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मात्र पावसामुळे खेळ खराब झाला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामना दोनदा थांबला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 28 […]
ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आज सकाळपासून सुरू होत्या. अखेर मनिषा कायंदे यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये त्यांचा शिवसेनेत जाहिर पक्ष प्रवेश झाला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]