कर संकलनात वाढ, 11 टक्के वाढीसह 3.80 लाख कोटी रुपये झाले जमा
जूनमध्ये आतापर्यंत आगाऊ कर वसुलीत चांगली वाढ झाली आहे. या आधारावर असे म्हणता येईल की आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा चांगला असणार आहे. चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. आतापर्यंत, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्राचे प्रत्यक्ष कर संकलन 3,79,760 कोटी रुपये आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत, हे प्रत्यक्ष कर संकलन 3,41,568 कोटी रुपये होते. (net-direct-tax-collection-rises-11-percent-to-rs-3-80-lakh-crore-so-for-in-financial-year)
17 जूनपर्यंत आगाऊ कर संकलनाची आकडेवारी
आगाऊ कर संकलनामुळे ही वाढ दिसून आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत 17 जूनपर्यंत आगाऊ कर संकलन 1,16,776 लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 13.70 टक्के अधिक आहे. वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 17 जूनपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 3,79,760 कोटी रुपये होते, ज्यात कॉर्पोरेट कर (CIT) च्या 1,56,949 कोटी रुपयांचा समावेश आहे. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) सह वैयक्तिक आयकर म्हणून 2,22,196 कोटी रुपये जमा झाले.
धार्मिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ‘गीता प्रेस’ला 2021 चा ‘गांधी शांतता पुरस्कार’
कॉर्पोरेट टॅक्सचेही चांगले आकडे
ढोबळ आधारावर, परतावा समायोजित करण्यापूर्वी संकलन 4.19 लाख कोटी रुपये होते. ही रक्कम वार्षिक आधारावर 12.73 टक्के वाढ दर्शवते. यामध्ये कॉर्पोरेट कराचे 1.87 लाख कोटी रुपये आणि सिक्युरिटीज व्यवहार करासह 2.31 लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकर समाविष्ट आहेत. 17 जूनपर्यंत परताव्याची रक्कम 39,578 कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, आगाऊ कर संकलन 13.7 टक्क्यांनी वाढून 116,776 कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 102,707 कोटी रुपये होते. आगाऊ कर संकलनात चांगली वाढ हे कराचे जाळे आणखी विस्तारत असल्याचे द्योतक आहे.