धार्मिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ‘गीता प्रेस’ला 2021 चा ‘गांधी शांतता पुरस्कार’

धार्मिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ‘गीता प्रेस’ला 2021 चा ‘गांधी शांतता पुरस्कार’

Gandhi Peace Prize 2021 : महात्मा गांधी शांतता पुरस्कार 2021 सनातन संस्कृतीच्या प्रचार करणाऱ्या गीता प्रेसला (Geeta Press, Gorakhpur) देण्यात येणार आहे. जगभरातील धार्मिक पुस्तके प्रकाशित करण्याचे सर्वात मोठे केंद्र म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे बदल करण्याच्या प्रयत्नांसाठी गीता प्रेसची निवड करण्यात आली आहे. गीता प्रेसला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.

गीता प्रेस 1923 मध्ये सुरू करण्यात आली होती. जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. आतापर्यंत 14 भाषांमध्ये 417 दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहेत, ज्यात श्रीमद्भगवद्गीतेच्या 16.21 करोड प्रतींचा समावेश आहे. गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात सरकारने 1995 मध्ये महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त गांधींनी मांडलेल्या आदर्शांचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली होती.

कपिल देवची ती वादळी खेळी… जी जगाला बघता आली नाही पण सामना बदलला

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, “गीता प्रेसने गेल्या 100 वर्षांत लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणण्याच्या दिशेने प्रशंसनीय कार्य केले आहे. मी गीता प्रेस, गोरखपूरचे गांधी शांतता पुरस्कार 2021 मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो.”

फादर्स डेला मुलगी समायरासोबत रोहित शर्मा दिसला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे की हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ किंवा लिंग विचारात न घेता दिला जाऊ शकतो. या पुरस्कारामध्ये एक कोटी रुपये, सन्मानपत्र, एक फलक आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला/हातमाग वस्तूंचा समावेश आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. अलीकडच्या काळात, हा पुरस्कार सुलतान काबूस बिन सैद अल सैद, ओमान (2019) आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, बांगलादेश (2020) यांना देण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube