Sacred Tree in Bali: 700 वर्ष जुन्या वृक्षासमोर ‘या’ अभिनेत्रीचे नग्न फोटोशूट; फोटो व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T131224.450

Luiza Kosykh Poses Naked In Front of Sacred Tree in Bali: एका ७०० वर्ष जुन्या झाडासमोर नग्न फोटो क्लीक केल्याने एका रशियन इंस्टाग्राम मॉडेलला बाली येथून हद्दपार करण्यात आले आहे. (Bali Kayu Putih) खरं तर ४० वर्षीय लुइझा कोसिख हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे नग्न फोटो पोस्ट (Naked Photoshoot) केल्याने बालिनी समुदाय नाराज झाले आहेत. (Luiza Kosykh ) फोटोंमध्ये, तिने बालीच्या तबानन मंदिरातील पवित्र कायू पुतिह या झाडासमोर फोटोसाठी पोज दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ni Luh Putu Ary Pertami Djelantik (@niluhdjelantik)


बालीमध्ये रशियन प्रभावशाली लुईझा कोसिख नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. (Russian influencer) तेथील लोकांचा आरोप आहे की, 700 वर्ष जुन्या झाडाला लागून तिचा फोटो काढण्यात आला होता. फोटोत तिने झाडासोबत नग्न फोटो काढले, त्याने या पवित्र झाडासोबत नग्न पोज दिली. हे एक प्राचीन कागदाच्या सालाचे झाड आहे. हे झाड तबानान रीजेंसीच्या बायन गावात आहे. हे एका मंदिराखाली वाढले आहे आणि लोक ते अतिशय पवित्र मानून पूजा करतात.

डेनपसार इमिग्रेशन कार्यालयाचे प्रमुख टेडी रियांडी यांनी अटकेची मागणी केली. एका इंडोनेशियन कार्यकर्त्याने या घटनेशी संबंधित एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे – हे परदेशी लोक आमच्या भूमीचा अपमान करतात त्यांना कोणीतरी सांगा की बाली आमचे घर आहे, तुमचे नाही. कार्यकर्त्याने सोशल मीडियावर महिलेचे फोटो पोस्ट केले होते, त्यावर कमेंट करत लोकांनी तिला अटक करण्याची मागणी करत आहेत. ही महिला झाडासोबत अश्लील फोटो देत असल्याचे दिसत आहे.

विजयानंतर दामलेंचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल शरद पवारांच्या भेटीला!

बाली लोकांचा असा विश्वास आहे की, या झाडामध्ये अनेक चमत्कारी शक्ती आहेत आणि त्या झाडापासून लोकांचे आजार बरे होतात. बालीमधील या झाडाजवळ कोणीतरी असे फोटो क्लिक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी रशियातील योगा ट्रेनर अलिना योगा यांनीही असेच फोटोशूट केले होते.

Tags

follow us