Siddharth and Kiyara : जैसलमेरमध्ये असा होणार शाही विवाहसोहळा
जैसलमेर : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता मात्र चाहत्यांना या विवाहसोहळ्याची जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण लवकरच अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाहबंधनात अडकणार आहेत.
या जोडप्याच्या विवाहसोहळ्याची तारीख, ठिकाण आणि पाहुण्यांची यादी देखील तयार झाली आहे. हा विवाहसोहळा रविवार 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला हा विवाहसोहळा समाप्त होईल. 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.
त्याचबरोबर या विवाहसोहळ्याच्या तयारीबद्दल सांगायचं झालं तर सोहळ्यासाठी सिद्धार्थ आणि कियाराने जैसलमेरमधील प्रसिद्ध पॅलेस सूर्यगड बुक केला आहे. या हाय प्रोफाइल विवाहसोहळ्यात करण जौहर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रापासून ईशा अंबानीसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. पाहुण्यांसाठी पॅलेसचे जवळपास 84 लग्झरी रूम्स बुक करण्यात आल्या आहेत.
सिद्धार्थ आणि कियाराच्या या रॉयल वेडिंगची जबाबदारी मुंबईतील एका मोठ्या वेडिंग प्लानर कंपनीला देण्यात आली आहे. हॉटेल बुकिंगपासून ट्रान्सपोर्टेशनपर्यंत सर्व तयारी झाली आहे. हॉटेल मॅनेजमेंट या विवाहास येणारे पाहुणे आणि इतर कार्यक्रमाची माहिती खूप गुप्त ठेवत आहेत. 4 फेब्रुवारीपासून या ठिकाणी पाहुणे येण्यास सुरूवात होणार आहे. 40 लोक 4 फेब्रुवारीला मुंबईहून फ्लाईटने जैसलमेरला पोहचतील.
हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हळदी, मेहंदी, संगीत आणि पेहरावांसाठी सेट डिझाइन करण्याचे कामही सुरू झाले आहे. जयपूरहून पाहुण्यांसाठी वाहने मागवली जात आहेत. राजवाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पाहुण्यांच्या गोपनीयतेचीही काळजी घेतली जाते.