Milind Gawali: आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्धच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Milind Gawali: आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्धच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या सिरीयलमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांच्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावले आहे. ते या सिरीयलमध्ये (Serial) अनुरुद्ध ही भूमिका साकारत आहेत. मिलिंग हे सोशल मीडियावर (Social media) देखील जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


अनेक विषयांवर पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी कॅमेरा (Camera) आणि फोटो (Photo) याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांनी काही आठवणींना चांगलाच उजाळा दिला आहे. मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांच्या हातात कॅमेरा दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन देखील दिला आहे.

बहुतेक सगळ्यांनाच आपला फोटो काढून घ्यायची हौस असते, मला तरी ती हौस खूप आहे! आणि आजकाल मोबाईलने सर्वाना अगदीच शक्य झालं आहे. त्यात काही लोक वेगळ्या विचारांची असता, ज्यांना स्वत:ची फोटो काढून घ्यायला अजिबात आवडत नाही. मग अशा लोकांचे मला कँडेड फोटो काढायला खूप आवडतात, त्यांचे फोटो त्यांच्या नकळत काढले तर छान येत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


मी आत्तापर्यंत माझा डिएसएलआर कॅमेरा घेऊन फिरत असायचो, शूटिंगला पण तो नेहमी घेऊन जायचो. डिएसएलआरची जी मजा आहे, ती मोबाईल फोनमध्ये कधीच येऊ शकत नाही. पण फोटो काढणं सोपं मात्र झाले आहे. अगोदर कॅमेरामध्ये कोड्याक किंवा फुजीचा रोल टाकावं लागायचा आणि मग तो 36 फोटोंचा रोल लॅबमध्ये डेव्हलपरला करण्यासाठी द्यावं लागायचा, मग सगळे फोटो एका अल्बममध्ये लावले जात असायचे, मोजके फोटो असायचे पण पाहायला खूप मजा येत असायची.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हजारो फोटो आहेत आणि ते एका सेकंदात जगाच्या कोणत्याही टोकाला असलेल्या कोणालाही सहज पाठवू शकतो. आपण कॅमेरामध्ये खूप प्रगती झाली नवनवीन टेक्नॉलॉजी वाढली, पण त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये जी मजा होती ती कुठेतरी हरवली असल्याचे अलीकडे वाटत आहे. मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या सिनेमामध्ये उत्तम काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावर असलेल्या पोस्ट चर्चेत येत असतात. आता आई कुठे काय करते सिरीयलमधील त्यांच्या अनुरुद्ध या भूमिकेला चाहत्यांनी विशेष लोकप्रियता मिळवून दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube