गुलाल फेम अभिनेता करणार सनी पाजींचा सामना, ‘Lahore: 1947’ मध्ये साकारणार खलनायकांची भूमिका
Sunny Deol : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 2023 मध्ये ‘गदर 2’ (Gadar 2‘) चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आहे. त्याचे पुनरागमन हे इंडस्ट्रीतील सर्वात मोठे कमबॅक म्हणता येईल. यानंतर अभिनेत्याला एकापेक्षा एक चित्रपट येत आहेत. आता सनी देओल पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटासाठी राजकुमार संतोषीसोबत काम करत आहे. चित्रपटाबाबत कायम नवनवून अपडेट समोर येत आहेत. आता त्याच्या चित्रपटात खलनायक कोण असणार याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
राजकुमार संतोषी या चित्रपटासाठी अभिमन्यू सिंगला कास्ट करत आहेत. अभिमन्यूने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या असून अशा भूमिकांसाठी त्याला पसंतीही मिळाली आहे. काही काळापूर्वी तो रणदीप हुड्डा यांच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता. यामध्ये तो एका नकारात्मक भूमिकेत होता आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता त्याला मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे.
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहोर नई देखा ओ जमई नई’ या नाटकावर आधारित आहे. या चित्रपटातील काही कलाकारांची कास्टिंग आधीच झाली आहे. या चित्रपटात शबाना आझमी, प्रीती झिंटा आणि मोना सिंग या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्याची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत होत आहे.
“मला काम आवडले नव्हते पण…”, रजनीकांतच्या ‘पेटा’ सिनेमाबद्दल अभिनेत्याने व्यक्त केली खंत
यापूर्वीही अनेक चित्रपट एकत्र केले: राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अगदी सनी देओलच्या टॉप चित्रपटांचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. घायाळ, दामिनी, घटक आणि भगतसिंग यांसारख्या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केले आहे. यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही केली. आता राजकुमार आणि सनी पाजीची ही रियुनियन यशस्वी होते का हे पाहायचे आहे.