अभिषेक बच्चन याने ETPL सुरुवातीचा केला श्री गणेशा ! “HERE WE GO! EUROPEAN T20 LEAGUE.”
Abhishek Bachchan ने ETPL 2026 च्या उद्घाटनाच्या दिवशी खास पोस्ट करून थेट मैदानावरून विशेष फोटो पोस्ट केले आहेत.
Abhishek Bachchan has kicked off the ETPL! “HERE WE GO! EUROPEAN T20 LEAGUE : अभिनेता, क्रीडा उद्योजक आणि European T20 Premier League सहसंस्थापक अभिषेक बच्चन याने ETPL 2026 च्या उद्घाटनाच्या दिवशी खास पोस्ट करून थेट मैदानावरून विशेष फोटो पोस्ट केले आहेत. लीगच्या ट्रॉफीजवळ उभे राहून फोटो पोस्ट करत “Here we go! European T20 League.” अस म्हंटल !
युरोपमध्ये व्यावसायिक T20 क्रिकेट घेऊन जाण्याची कल्पना आली आणि त्याची सुरुवात देखील झाली ! उद्घाटनाच्या हंगामातील पहिली मॅच बघण्यासाठी अभिषेक देखील उपस्तिथ आहे. या आठवड्यात वूरबर्ग येथे होणाऱ्या सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना आहे ज्यामुळे Ireland, Scotland आणि Netherlands मध्ये होणाऱ्या मैच ची देखील उत्सुकता आहे.अभिषेक बच्चन याने सौरभ बॅनर्जी , प्रियांका कौल आणि धीरज मल्होत्रा यांच्यासोबत ETPL ची सहसंस्थापना केली असून तो टीमचा सहमालकही आहे.
कधी खट्याळ, कधी हळवं, तर कधी शब्दांपलीकडचं; रक्षाबंधन स्पेशल, आदि श्रावणीचं खास बॉन्डिंग!
अभिषेक बच्चन यांच्यासाठी हा क्षण त्यांनी क्रीडा मालकीबाबत घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत आहे केवळ दिखाऊ संबंध म्हणून नव्हे, तर संस्था उभारणी म्हणून. भारतात कबड्डी आणि फुटबॉलमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर, ETPL हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी क्रिकेट उपक्रम आहे, ज्याचा उद्देश अशा बाजारपेठेत व्यावसायिक T20 क्लब स्पर्धा निर्माण करणे आहे जिथे यापूर्वी अशी स्पर्धा नव्हती. त्यांची पोस्ट आधीच व्हायरल होत असून ट्रॉफी मैदानावर आहे पहिला सामना निश्चित झाला आहे, आणि लीग अखेर सुरू झाली आहे अस म्हणत त्याने श्रीगणेशा केला आहे.