‘बेक सेल बोनान्झा’ चा आयोजन करत अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटने साजरा केला आगळावेगळा ‘व्हॅलेंटाइन्स डे’

  • Written By: Published:
‘बेक सेल बोनान्झा’ चा आयोजन करत अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटने साजरा केला आगळावेगळा ‘व्हॅलेंटाइन्स डे’

Valentine Day 2025 : जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे (Valentine Day 2025) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जण फुलं, भेटवस्तू देऊन आपली भावना व्यक्त करतात, तर काही जण खास डेट प्लॅन करून हा दिवस संस्मरणीय करतात. ‘अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ (Academy of Learning and Development) या संस्थेच्या विशेष मुलांनी ही यंदाचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ खास पद्धतीने साजरा केला.

प्रेमाचा हा दिवस खास करण्यासाठी या संस्थेतर्फे ‘बेक सेल बोनान्झा’ (Bake Sale Bonanza) आयोजित करण्यात आला. त्याला विद्यार्थ्यांचे पालक, पाहुणे यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या विशेष मुलांनी तयार केलेली बेकरी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

या खास उपक्रमाला अभिनेता दर्शिल सफारी (Actor Darshil Safari) उपस्थित होता. या मुलांच्या हातची कला थक्क करणारी असल्याची प्रतिक्रिया दर्शिल सफारीने यावेळी व्यक्त केली. अभिनेते अजिंक्य देव यांनी ही संस्था सुरु केली असून या संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन्स डे’ ला ‘बेक सेल बोनान्झा’ आम्ही आयोजित केल्याचे अजिंक्य देव यांनी सांगितले.

मोठी बातमी! महाकुंभातील सेक्टर 19 मधील अनेक मंडपांमध्ये आग, भाविकांमध्ये घबराट

या मुलांच्या कौशल्याला योग्य तो वाव मिळावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो, असे अजिंक्य देव यांनी सांगितले. ‘बेक सेल बोनान्झा’ ला मिळालेला प्रतिसाद आम्हाला सुखावणारा आहे.

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने होणार बंद 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या